घरक्रीडाUS OPEN 2018 : जोकोविचची अंतिम फेरीत धडक

US OPEN 2018 : जोकोविचची अंतिम फेरीत धडक

Subscribe

नोवाक जोकोविचने जपानच्या काई निशिकोरीचा पराभव करत अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम फेरीत त्याचा सामना जुआन मार्टिन डेल पोट्रोशी होईल.

वर्षाचा शेवटचा ग्रॅड स्लॅम अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत सर्बियाचा टेनिस स्टार नोवाक जोकोविचने जपानच्या काई निशिकोरीचा पराभव करुन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. जोकोविचने निशिकोरीचा ६-३, ६-४, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची जोकोविचची ही आठवी वेळ आहे. त्याने याआधी ही स्पर्धा दोन वेळा जिंकली आहे.

निशिकोरीचा सरळ सेटमध्ये पराभव 

उपांत्य फेरीतील सामन्याची सुरूवात जोकोविचने अगदी अप्रतिम केली. त्याने पहिल्या सेटमध्ये सुरूवातीलाच ४-१ अशी आघाडी मिळवली. त्यामुळे निशिकोरीचा आत्मविश्वास काहीसा खालावला. याचा फायदा घेत जोकोविचने हा पहिला सेट ६-३ असा जिंकला. तर दुसऱ्या सेटमध्ये निशिकोरीने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. या सेटमध्ये २-२ अशी बरोबरी असताना जोकोविचने निशिकोरीची सर्विस मोडली आणि ३-२ अशी आघाडी मिळवली. हा फरक निशिकोरीला भरून काढता आला नाही आणि त्याने हा सेट ६-४ असा जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये निशिकोरीला चांगला खेळ करता आला नाही. जोकोविचने हा सेट अगदी आरामात जिंकत हा सामनाही जिंकला.

 


सर्वोत्तम खेळ करण्यावर भर 

निशिकोरी विरुद्धच्या विजयामुळे जोकोविचने आठव्यांदा अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यानंतर जोकोविच म्हणाला, “प्रत्येक टेनिसपटूचे ग्रँड स्लॅम जिंकणे हे स्वप्न असते. मी बऱ्याच ग्रँड स्लॅम फायनलमध्ये खेळलो. काहीत जिंकलो तर काहीत हरलो. पण माझा नेहमी भर सर्वोत्तम खेळ करण्यावर असतो. मला अमेरिकन ओपनमध्ये खेळायला नेहमीच आवडते.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -