French open 2022: नोव्हाक जोकोविचला मोठा दिलासा, फ्रेंच ओपन खेळण्यासाठी मार्ग मोकळा

जगातिक दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळू शकला नाही. कोरोना लसीकरणच्या वादामुळे त्याला पुन्हा एकदा मायदेशी परतावे लागले. जोकोविचने न्यायालयापर्यंत लढा दिला होता. पण शेवटी त्याला पराभवासमोर सामोरे जावे लागले. परंतु आता फ्रान्स सरकारने नोव्हाक जोकोविचला मोठा दिलासा दिला आहे. कोरोना लसीकरणाच्या नव्या नियमांमुळे लसीकरण नसतानाही जोकोविचला मे महिन्यात फ्रेंच ओपनमध्ये खेळण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये कोरोना लसीकरण नियमांचे पालन न केल्यामुळे जोकोविचला ऑस्ट्रेलियन ओपन खेळण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. तसेच त्याला देशातून हद्दपार करण्यात आले होते. फ्रान्समध्ये कोविड-१९ चे नियम आणि कायदे नवीन असल्यामुळे जोकोविच फ्रेंच ओपनमध्ये खेळणार की नाही, यावर शंका होती. कारण नव्या नियमांनुसार ज्यांनी लसीकरण केलेलं नाहीये. त्यांना स्टेडियम, रेस्टॉरंट, बार किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी प्रवेश दिला जात नाहीये. मात्र, फ्रान्स सरकारने जोकोविचला मोठा दिलासा दिलाय.

क्रीडामंत्र्यांनी काय सांगितलं ?

कोविड-१९ चे नियम जाहीर झाल्यानंतर प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी प्रवेशासाठी लसीकरण पास अनिवार्य असणार असेल आणि हे नियम प्रेक्षक, फ्रेंच आणि परदेशी व्यावसायिकांना सुद्दा लागू असणार आहेत, असं फ्रान्सचे क्रीडामंत्री रोक्साना एम यांनी सांगितलं आहे.

२१ वं ग्रँडस्लॅम हुकलं

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत नोव्हाक जोकोविच खेळणार होता. परंतु विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणाऱ्या जोकोविचचे स्वप्न भंग झाले. त्याच्या नावावर आतापर्यंत २० ग्रँडस्लॅम आहेत. पुरूषांच्या गटामध्ये सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या बाबतीत तो स्पेनचा राफेल नदाल आणि स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररच्या बरोबरीत आहे.

१६ जानेवारी रोजी ऑस्ट्रेलियन कोर्टात नोव्हाक जोकोविचने केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली. जनहिताच्या निर्णयाच्या आधारावर जोकोविचचा व्हिसा रद्द करण्याचा याआधीचा निर्णय न्यायालयाने कायम ठेवला. त्यामुळे जोकोविचला मायदेशी परतावे लागले. जोकोविचने ऑस्ट्रेलियन कोर्टाच्या निर्वासनाविरोधात अपिल केली होती. पण ही अपिल न्यायालयाने फेटाळून लावली. जोकोविचची तीन वर्षांची ऑस्ट्रेलिया प्रवेशाची बंदीही या आदेशान्वये कायम राहणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपन २०२२ या स्पर्धेपासून जोकोविचला मुकावे लागले होते.


हेही वाचा : Brendan Taylor : स्पॉट फिक्सिंगसाठी ब्लॅकमेल केलं, भारतीय उद्योगपतीनं कोकेनं दिलं ; क्रिकेटपटूचा खळबळजनक आरोप