Eco friendly bappa Competition
घर क्रीडा Novak Djokovic : न्यायालयीन लढाई जिंकत नोवाक जोकोविच दिसला टेनिस कोर्टात, न्यायाधीशांचे...

Novak Djokovic : न्यायालयीन लढाई जिंकत नोवाक जोकोविच दिसला टेनिस कोर्टात, न्यायाधीशांचे आभार, म्हणाला…

Subscribe

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला टेनिसपटू नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियाच्या न्यायालयातील लढाई जिंकली आहे. सर्बियाच्या नोवाक जोकोविचच्या व्हिसा रद्द करण्याच्या ऑस्ट्रेलियन सरकारच्या निर्णयाची बाजू फेडरल कोर्टाने पलटवली आहे. कोर्टाने नोवाकला मोठा दिलासा दिला आहे. परंतु न्यायालयीन लढाई जिंकत नोवाक जोकोविचने न्यायाधीशांचे आभार मानले आहे.

न्यायाधीशांनी माझा व्हिसा रद्द न करण्याचे आदेश दिले. त्यामुळे मी खूप आनंदी आणि त्यांचा कृतज्ञ आहे. एवढे प्रकरण झाल्यानंतरही स्पर्धेत खेळण्याचा माझा प्रयत्न आहे. सध्या त्यावर मी लक्ष केंद्रीत केलं आहे. मी येथे उड्डाण सर्वात महत्त्वाच्या कार्यक्रमांपैकी चाहत्यांसमोर खेळण्यासाठी केलंय, असं ट्विट नोवाक जोकोविचने केलं आहे.

- Advertisement -

व्हिसा रद्द न करण्याचे आदेश

न्यायाधीशांनी जोकोविचच्या बाजूने निकाल देत व्हिसा रद्द न करण्याचे आदेश दिले. यासोबतच त्याला तात्काळ डिटेन्शन सेंटरमधून अन्य ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा अर्थ आता गतविजेता आणि सर्वाधिक नऊ वेळा विजेतेपद पटकावणारा जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये दहाव्या विजेतेपदासाठी लढणार आहे. जोकोविचला ऑस्ट्रेलियातून बाहेर पाठवण्याचा अधिकार सरकारकडे अजूनही आहे, असे ते मानतात. नियम आणि कायदे सर्वांसाठी समान आहेत, या अंतर्गत व्हिसा रद्ददेखील केला जाऊ शकतो.ॉ

काय आहे नेमकं प्रकरण?

- Advertisement -

लसीकरणातून वैद्यकीय सवलत मिळाल्यामुळे जोकोविच ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बुधवारी मेलबर्नमध्ये दाखल झाला. मात्र, आठ तासांहून अधिक वेळ त्याला विमानतळावरच थांबवलं होतं. कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या विदेशी नागरिकांनाच ऑस्ट्रेलियात प्रवेशानाची परवानगी आहे. परंतु जोकोविचने लसीकरणाचा नियम न पाळल्याने ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दलाने जोकोविचचा व्हिसा रद्द केला होता. परंतु व्हिसा रद्द न करण्याबाबत ऑस्ट्रेलिया्च्या कोर्टात न्यायालयीन लढाई जिंकला आहे.


हेही वाचा : IPL 2022 : BCCIकडून अहमदाबाद टीमला मंजूरी, कोण होणार टीमचा कर्णधार?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -