घरक्रीडाIND vs NZ Test series : सामन्याआधीच विलियमसनने सांगितला वीक पॉइंट;...

IND vs NZ Test series : सामन्याआधीच विलियमसनने सांगितला वीक पॉइंट; म्हणाला…

Subscribe

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने पहिल्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला संघाच्या कमजोरीबाबत भाष्य केले आहे

भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये २५ नोव्हेंबर म्हणजेच गुरूवारपासून २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होणार आहे. पहिला सामना कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर पार पडणार आहे. दरम्यान न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार केन विलियमसनने सामन्यापूर्वीच संघाच्या कमजोरी बाबत भाष्य केले आहे. त्याने म्हंटले की, न्यूझीलंडच्या संघाला भारतीय फिरकीपटूंपासून अधिक सावध खेळण्याची गरज असून यासाठी नवीन योजना आखणे गरजेचे आहे. गुरूवारी होणाऱ्या सामन्याबाबत सरावादरम्यान याबाबत चर्चा सुरू आहे. न्यूझीलंडच्या संघ कसोटी मालिकेच्या दौऱ्यासाठी शेवटच्या वेळी भारतात २०१६ मध्ये आला होता. तेव्हा अश्विनने (२७) बळी तर जडेजाने (१४) बळी घेतले होते. दोन्हीही फिरकीपटूंच्या आक्रमक फिरकीच्या माऱ्यासमोर न्यूझीलंडचे फलंदाज चितपट झाले होते. बदल्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा मालिकेत ३-० ने पराभव केला होता.

विलियमसनने बुधवारी सांगितले की, “आम्ही भारतीय गोलंदाजांच्या फिरकीची ताकद जाणून आहोत आणि त्यांनी इथे मोठ्या कालावधीपासून चांगली गोलंदाजी केली आहे. आमच्यासाठी वेगळ्या पध्दतीने खेळणे योग्य असेल, सोबतच मोठी धावसंख्या उभारणे आणि भागीदारी करणे खूप महत्त्वाचे असणार आहे”.

- Advertisement -

अश्विन-जडेजा आव्हानात्मक -विलियमसन

विलियमसनच्या म्हणण्यानुसार प्रत्येक खेळाडू वेगळा आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या पद्धती एकमेकांपेक्षा थोड्या वेगळ्या असतील पण काही आव्हाने पेलण्याची आणि शक्य तितकी तयारी करण्याची गरज आहे यात शंका नाही. “मला माहित आहे पूर्ण मालिकेत फिरकीपटू महत्त्वाची भूमिका पार पाडतील. मात्र मला वाटते की कानपूरचे मैदान थोडे वेगळे आहे आणि इथे आम्ही २०१६ मध्ये शेवटचा सामना खेळलो होतो. त्यामुळे परिस्थितीतीला लवकर समजणे आमच्यासाठी चांगले असेल”. असे विलियमसनने म्हंटले.

विलियमसनने भारतीय मैदानावर फिरकी गोलंदाजांना मिळणाऱ्या मदतीमुळे फलंदाजांसाठी हे मोठे आव्हान असल्याचे म्हंटले. त्याने आणखी सांगितले की, “आम्ही सामन्याच्या पूर्वीच एका नियोजनाने डावाची सुरूवात करू, कारण धावा उभारताना त्या नियोजनाचा आम्हाला फायदा मिळू शकेल. यापूर्वी कित्येक संघानी इथे कित्येक आव्हानाचा सामना केला आहे. त्यामुळे मला अपेक्षा आहे की आम्ही देखील पूर्ण मालिकेत फिरकीपटू गोलंदाजांचा सामना करू शकू, आम्ही प्रत्येक खेळाडूला तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

- Advertisement -

हे ही वाचा: IND vs NZ Test series : कर्णधार रहाणेसाठी कोच द्रविंड यांचा क्लास; खुद्द द्रविड यांनी केली बॉलिंग


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -