घरक्रीडाOdean Smith IPL 2022 Auction: धवन, कोहलीला बाद करणाऱ्यावर पंजाब किंग्जकडून पैशांचा...

Odean Smith IPL 2022 Auction: धवन, कोहलीला बाद करणाऱ्यावर पंजाब किंग्जकडून पैशांचा पाऊस, जाणून घ्या कितीला खरेदी?

Subscribe

स्मिथ पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याने 2018 मध्ये वेस्ट इंडिजसाठी टी-20 मध्ये पदार्पण केले होते, परंतु त्याला वनडे पदार्पण करण्यासाठी वेळ लागला. त्याने यंदा जानेवारीत आयर्लंडविरुद्ध वनडेत पदार्पण केले.

नवी दिल्लीः अलीकडेच भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत गोलंदाजी आणि फलंदाजीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या वेस्ट इंडिजचा खेळाडू ओडेन स्मिथला IPL-2022 मेगा लिलावात भरपूर पैसे मिळालेत. या खेळाडूने त्याची मूळ किंमत एक कोटी रुपये ठेवली होती आणि पंजाब किंग्जने त्याला सहा कोटी रुपयांना खरेदी केले. लखनऊ सुपरजायंट्स आणि सनरायझर्स हैदराबादने या खेळाडूंसाठी बोली लावली, पण पंजाबने बाजी मारली.

स्मिथ पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याने 2018 मध्ये वेस्ट इंडिजसाठी टी-20 मध्ये पदार्पण केले होते, परंतु त्याला वनडे पदार्पण करण्यासाठी वेळ लागला, त्याने यंदा जानेवारीत आयर्लंडविरुद्ध वनडेत पदार्पण केले.

- Advertisement -

धवन-कोहली बाद

भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेत स्मिथने विराट कोहली आणि शिखर धवनसारख्या फलंदाजांना बाद केले होते. दुसऱ्या सामन्यात केरॉन पोलार्ड जखमी झाल्याने त्याला संधी मिळाली आणि या सामन्यात ऋषभ पंत आणि विराट कोहली एकाच षटकात बाद झाले. त्याने आधी पंतचा बळी मिळवला आणि नंतर कोहलीची विकेट घेतली. तिसऱ्या सामन्यात त्याने शिखर धवनला बाद केले.

क्रमवारीत उतरताना या फलंदाजामध्ये जोरदार फटके मारण्याची ताकदही आहे. दुसऱ्या सामन्यात त्याने 24 धावा केल्या आणि भारतीय लेगस्पिनर युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर मोठे षटकार ठोकले. दुसऱ्या सामन्यात त्याने 36 धावा केल्या आणि या सामन्यात त्याने कुलदीप यादववर चारीमुंड्या चित केले.

- Advertisement -


पंजाब किंग्जच्या संघाने नऊ कोटी रुपयांमध्ये शाहरुख खानला खरेदी केले. शाहरुखसोबत स्मिथ पंजाबसाठी फिनिशर म्हणून दिसू शकतो. हे दोघे गेले तर गोलंदाजांसाठी ते चांगले नाही. अहमदाबादच्या खेळपट्ट्यांवर स्मिथने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, तशीच गोलंदाजी स्मिथने एकदिवसीय मालिकेत करावी, अशी पंजाबला अपेक्षा असेल.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -