घर क्रीडा ODI World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंड संघाची घोषणा, स्टार खेळाडूची...

ODI World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंड संघाची घोषणा, स्टार खेळाडूची निवृत्तीनंतर पुन्हा एन्ट्री

Subscribe

ODI World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून भारतात सुरूवात होणार आहे. तब्बल 12 वर्षानंतर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे भारतात आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियानंतर आता इंग्लंड संघाने 15 खेळाडूंची घोषणा केली आहे. मागील वर्षी इंग्लंडच्या स्टार खेळाडूने निवृत्ती जाहीर केली होती. मात्र आता त्याने यू-टर्न घेतल्यानंतर त्याला विश्वचषकासाठी संघात स्थान देण्यात आले आहे. (ODI World Cup 2023 England squad announced for World Cup star players re entry after retirement)

हेही वाचा – Asia Cup 2023 : भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या पाकिस्तानी गोलंदाजाने केली निवृत्ती जाहीर

- Advertisement -

भारतात यंदा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान आयसीसीकडून एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने 7 ऑगस्ट रोजी 18 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली होती. या 18 खेळाडूंमधून 15 जण विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. ऑस्ट्रेलियानंतर आता इंग्लंडनेही विश्वचषक स्पर्धेसाठी  15 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. जोस बटलर या संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेल्या बेन स्टोक्स यांने यू-टर्न घेत संघात स्थान मिळवले आहे. विश्वचषकाआधी न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या 4 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्येही तो खेळताना दिसणार आहे.

 

- Advertisement -

बेन स्टोक्सने इतर संघांना आणले अडचणीत

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने 2022 मध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. 2019 मध्ये त्याने इंग्लंडला विश्वचषक जिंकवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. अशा परिस्थितीत 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी त्याने वनडेतून निवृत्ती काढून इतर संघांना अडचणीत आणले आहे. बेन स्टोक्सने आतापर्यंत इंग्लंडकडून 105 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2924 धावा केल्या आहेत.

हेही वाचा – न्यायालयात महिलांसाठी ‘हे’ शब्द आता वापरले जाणार नाहीत; सर्वोच्च न्यायालयाने हँडबुक केलं जारी

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंड संघ – जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, मार्क वुड आणि ख्रिस वोक्स.

- Advertisment -