ODI World Cup 2023 : येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात विश्वचषकाला सुरुवात होणार असून आता अवघ्या आठ दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. यंदाची स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने पार पडणार आहे. दहा संघ सहभागी होणार असून 48 सामने खेळवण्यात येणार आहे. त्याआधी विश्वचषकात सहभागी होणारे सर्व संघ सराव सामने खेळताना दिसणार आहेत. (ODI World Cup 2023 PreWorld Cup warm up schedule revealed Live broadcast can also be watched)
हेही वाचा – संघाचे एकच लक्ष्य वर्ल्डकप जिंकण्याचे; कर्णधार रोहित शर्माने बोलून दाखवला निश्चय
उद्यापासून (29 सप्टेंबर) सराव सामन्याला सुरूवात होणार असून पहिला सामना बांग्लादेश आणि श्रीलंका यांच्यात गुवाहाटी येथे खेळवला जाणार आहे. तर याच दिवशी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्या दुसरा सराव सामना खेळवला जाणार आहे. यानंतर 30 सप्टेंबर रोजी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध आपला पहिला सराव सामना खेळणार आहे आणि त्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी भारतीय संघ नेदरलँडविरुद्ध दुसरा सराव सामना खेळणार आहे. विश्वचषक स्पर्धेतील सराव सामन्यांच्या वेळापत्रकानुसार यंदा सर्व संघ 2-2 सराव सामने खेळणार आहेत. सराव सामने गुवाहाटी, तिरुवनंतपुरम आणि हैदराबाद क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. सर्व सराव सामने दुपारी 2 वाजल्यापासून खेळवले जाणार असून सर्व सराव सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाणार आहे.
ICC Men’s Cricket World Cup 2023 – Warm Up Matches – Schedule#WorldCup2023 pic.twitter.com/PcurHsNjxk
— Green Shirts 🇵🇰✌ (@ZiaDoesCricket) September 27, 2023
सराव सामन्यांचे वेळापत्रक
29 सप्टेंबर 2023 –
- बांगलादेश विरुद्ध श्रीलंका, बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी
- दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान, ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम
- न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद
30 सप्टेंबर 2023
- भारत विरुद्ध इंग्लंड, बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स, ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम
हेही वाचा – Asian Games 2023: नेमबाजीत पदकांची लयलूट; भारताच्या सिफ्ट कौरची जागतिक विक्रमासह सुवर्ण कामगिरी
2 ऑक्टोबर 2023
- इंग्लंड विरुद्ध बांगलादेश, बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी
- न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम, तिरुवनंतपुरम
3 ऑक्टोबर 2023
- अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका, बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी
- भारत विरुद्ध नेदरलँड्स, ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम
- पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद