घरक्रीडाऑलिम्पिक पुढे ढकलला!

ऑलिम्पिक पुढे ढकलला!

Subscribe

करोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंना सराव करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलली पाहिजे, असे मत भारताचे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केले. ऑलिम्पिक वेळापत्रकानुसार घेण्यास आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) आणि आयोजक उत्सुक आहेत. परंतु, तसे झाल्यास खेळाडूंच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकेल असे म्हटले जात आहे. त्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यासाठी आयओसीवर दबाव वाढत आहे.

ऑलिम्पिक वेळेवर होईल याबाबत मी साशंक आहे. ऑलिम्पिकला अजून बराच वेळ शिल्लक आहे असे नाही. ही स्पर्धा चार महिन्यांत सुरु होणार असून यासाठी खेळाडूंनी सरावाला आतापासून सुरुवात करणे गरजेचे आहे. त्यामुळे आयओसीने ऑलिम्पिकबाबत अंतिम निर्णय घेतला पाहिजे, जेणेकरुन खेळाडूंमधील संभ्रम कमी होईल. सध्या सर्वांच्याच आरोग्याला धोका आहे, तसेच प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रत्येक देश आपल्या नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करत आहे. त्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेऊन ऑलिम्पिक पुढे ढकलणे हाच योग्य निर्णय आहे, असे गोपीचंद यांनी नमूद केले.

- Advertisement -

करोनाचा धोका लक्षात घेऊन जवळपास सर्व स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परंतु, मागील आठवड्यात ऑल इंग्लंड स्पर्धा झाली. त्यामुळे जागतिक बॅडमिंटन फेडरेशनवर (बीडब्ल्यूएफ) बरीच टीका झाली. याबाबत गोपीचंद म्हणाले, खेळाडूंना धोक्यात घालून ऑल इंग्लंड स्पर्धा सुरु ठेवत बीडब्ल्यूएफने चूकच केली.

बीडब्ल्यूएफला कोणताही निर्णय घेणे अवघड!
खेळाडूंनी टीका केल्यानंतर बीडब्ल्यूएफने १२ एप्रिलपर्यंत आपल्या सर्व स्पर्धा रद्द केल्या. बॅडमिंटनपटूंना ऑलिम्पिकला पात्र ठरण्यासाठी २८ एप्रिलपर्यंतचा कालावधी आहे. मात्र, हा कालावधी वाढवण्यात यावा अशी खेळाडूंची मागणी आहे. परंतु, याबाबतचा कोणताही निर्णय घेताना बीडब्ल्यूएफला खूप विचार करावा लागेल, असे गोपीचंद यांना वाटते. आतासारखी परिस्थिती आपण यापूर्वी अनुभवलेली नाही. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना खूप विचार करावा लागेल. प्रत्येकासाठी जे योग्य असेल, ते केले पाहिजे. आपण प्रत्येकाला खुश करु शकत नाही. बीडब्ल्यूएफला कोणताही निर्णय घेणे अवघड आहे. त्यांच्या निर्णयावर टीका होणारच आहे. ऑलिम्पिक पात्रतेचा कालावधी वाढवताना त्यांना व्हिसा, स्थानिक असोसिएशन यांसारख्या गोष्टींचाही विचार करावा लागेल, असे गोपीचंद म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -