घरक्रीडाOmicron threat: टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिकेतील दौऱ्यावर ओमिक्रॉनचं संकट, CSAकडून स्थानिक पातळीच्या...

Omicron threat: टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिकेतील दौऱ्यावर ओमिक्रॉनचं संकट, CSAकडून स्थानिक पातळीच्या खेळांना स्थगिती

Subscribe

टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिकेतील दौऱ्यावर ओमिक्रॉनचं संकट घोंघावत आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिका CSAकडून टीम मधील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे स्थगितीचा निर्णय घेतला आहे.CSAकडून स्थानिक पातळीच्या खेळांना स्थगिती देण्यात आली आहे. या महिन्यात होणाऱ्या टीम इंडियाच्या आफ्रिका दौऱ्यावर चिंता व्यक्त केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सुद्धा यावर लवकरच मोठा निर्णय घेणार असून १७ डिसेंबरला पहिल्या चाचणीची सुरूवात करण्यात येणार आहे. जर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मालिका झाली तर सुरक्षित परिसरात ही मालिका खेळवली जाऊ शकते.

- Advertisement -

सीएसए बोर्डाने सांगितलं की, डिविझन टू सीएसए चार दिवसीय घरात खेळली जाणारी मालिकेच्या चौथ्या दौऱ्या दरम्यान तीन सामने स्थगित करण्यात आले आहेत. ज्याला पाच डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये टीम पोहोचण्यापूर्वीच पॉझिटिव्ह केसेस समोर आले आहेत. खेळाशी संबंधीत आरोग्य, सुरक्षा आणि कोविड १९ वर नियंत्रण करणं ही बोर्डाची प्राथमिकता आहे.

सीएसए परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. वेळ आल्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच आठवड्याभरात होणाऱ्या तीन दिवसीय व एकदिवसीय मालिकेवर २०२२ पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. टीम इंडियाचा क्रार्यक्रमानुसार ८ ते ९ डिसेंबर रोजी आफ्रिकेचा दौरा आहे. १७ डिसेंबर रोजी जोहानिसबर्गमध्ये कसोटी सामना दौऱ्या दरम्यान टीम इंडियाला जवळपास सात आठवड्यांपर्यंत तीन कसोटी सामने, तीन एकदिवसीय सामने आणि चार टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले जाणार आहेत. जवळपास हे सामने जोहानिसबर्ग, सेंच्युरिअन, पार्ल आणि केपटाऊनमध्ये खेळले जाणार आहेत.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -