घरक्रीडाOn This Day : २००८ मध्ये आजचा दिवस कोहलीसाठी ठरला होता खास!

On This Day : २००८ मध्ये आजचा दिवस कोहलीसाठी ठरला होता खास!

Subscribe

भारताचा कर्णधार विराट कोहली सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. कोहलीने आतापर्यंत भारताकडून ७० शतके केली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या सक्रिय फलंदाजांमध्ये कोहलीचा अव्वल क्रमांक लागतो. कोहलीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात २००८ मध्ये आजच्या दिवशीच (१८ ऑगस्ट) झाली होती. परंतु, पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात त्याला केवळ १२ धावा करता आल्या. कोहलीने सलामीला येताना २२ चेंडू खेळून काढले होते आणि त्याला डावाच्या आठव्या षटकात वेगवान गोलंदाज नुवान कुलसेकराने बाद केले होते.

कोहलीच्या पदार्पणाच्या सामन्यात भारत पराभूत

कोहलीच्या पदार्पणाच्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात भारताचा डाव ४६ षटकांत अवघ्या १४६ धावांत आटोपला होता. अजंता मेंडिस आणि मुथय्या मुरलीधरन यांनी तीन-तीन विकेट घेतल्या होत्या. १४७ धावांचे आव्हान श्रीलंकेने ३४.५ षटकांत आठ विकेट राखून गाठले होते. त्यांच्याकडून कर्णधार महेला जयवर्धने (नाबाद ६१) आणि चमारा कापुगेदरा (नाबाद ४५) यांनी अप्रतिम फलंदाजी केली होती.

- Advertisement -

एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४३ शतके

कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्या शतकासाठी १४ सामने थांबावे लागले. त्याने २००९ मध्ये कोलकाता येथे श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात १०९ धावांची मॅचविनिंग खेळी केली होती. त्यानंतर कोहलीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४३ शतके करण्यात यश आले आहे. तसेच त्याने कसोटी क्रिकेटमध्येही २७ शतके केली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत ५० हून अधिकच्या सरासरीने धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे.


हेही वाचा – विराटचा खराब फॉर्म, सचिन तेंडुलकरने सांगितलं त्यामागचं कारण

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -