घरक्रीडाआज जिंकू किंवा मरू

आज जिंकू किंवा मरू

Subscribe

 चिन्नास्वामी स्टेडियमवर मालिकेचा निकाल

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन-डे मालिका आता निर्णायक स्थितीत येऊन पोहचली आहे. सध्या मालिका १-१ अशा बरोबरीत आहे. वानखेडे मैदानावर पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर, राजकोटमध्ये भारताने दमदार पुनरागमन केले आहे. या मालिकेतील अखेरचा सामना आज (रविवारी) बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर खेळवला जाणार आहे. मालिकेत बाजी मारण्यासाठी दोन्ही संघांना अखेरच्या सामन्यात विजय मिळवण्याची आवश्यकता आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ आतापर्यंत बंगळुरुमध्ये गेल्या ६ सामन्यांपैकी एक सामना हरलेला आहे. ऑस्ट्रेलियाने हा एकमेव सामना भारताविरुद्धच गमावलेला होता.त्यामुळे या मैदानावर ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान राहणार आहे.ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीच्या तुलनेत फलंदाजी चांगली राहिली आहे.त्यांचे फिंच,वॉर्नर,स्मिथ चांगल्या फॉर्मात आहेत,त्यामुळे भारतीय गोलंदाजांसमोर त्यांचे मोठे आव्हान असणार आहे. भारतीय फलंदाजी पाहता महत्वाचा फलंदाज असलेल्या विराट कोहलीची बंगळुरुच्या मैदानावरील फलंदाजी सरासरी आहे अवघी १२.६ एवढी आहे.या मैदानावर आपल्या शेवटच्या ५ सामन्यांमध्ये विराटने केवळ ६३ धावा केल्या असून त्याची सर्वोच्च धावसंख्या ही ३४ आहे. भारतीय संघासाठी ही बाब चिंताजनक ठरु शकते.परंतु, दोन देशांमधील वन-डे मालिकेच्या अखेरच्या सामन्यात गेल्या ११ सामन्यांची आकडेवारी तपासली तर रोहित शर्माची फलंदाजी आश्वासक राहिलेली आहे. त्याने ५३.४६ च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. यातील ४ सामन्यांत पहिल्यांदा फलंदाजी करताना रोहितने ४२८ धावा काढल्या असून यात एका द्विशतकाचाही समावेश आहे.

- Advertisement -

भारताला पराभूत करणारा ऑस्ट्रेलिया एकमेव

विशेष म्हणजे 2001 पासून बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर वन-डे क्रिकेटमध्ये भारताला पराभूत करणारा ऑस्ट्रेलिया हा एकमेव संघ आहे. २००१ पासून भारतीय संघ या मैदानावर १० आंतरराष्ट्रीय वन-डे सामने खेळला आहे, ज्यापैकी ६ सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. दोन सामन्यांत भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध होते.

भारत वि.ऑस्ट्रेलिया 3 रा सामना

- Advertisement -

स्थळ-चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूरू

थेट प्रक्षेपण-दुपारी 1.30 वाजल्यापासून,स्टार स्पोर्ट नेटवर्क

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -