Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा MS.Dhoni: आजच्याच दिवशी धोनीने केला होता हा विक्रम; केवळ १४५ चेंडूत केल्या...

MS.Dhoni: आजच्याच दिवशी धोनीने केला होता हा विक्रम; केवळ १४५ चेंडूत केल्या होत्या १८३ धावा

Subscribe

आजच्याच दिवशी म्हणजेच १६ वर्षापूर्वी ३१ ऑक्टोबर २००५ रोजी भारतीय संघाचा माजी कर्णधार एम.एस धोनीने श्रीलंका विरूध्द १८३ धावांची आक्रमक फलंदाजी करून एक नवा विक्रम आपल्या नावावर केला होता

आजच्याच दिवशी म्हणजेच १६ वर्षांपूर्वी ३१ ऑक्टोबर २००५ रोजी भारतीय संघाचा माजी कर्णधार एम.एस धोनीने श्रीलंका विरुद्ध १८३ धावांची आक्रमक फलंदाजी करून एक नवा विक्रम आपल्या नावावर केला होता. त्यासामन्यात धोनीला या अविस्मरणीय खेळीच्या बदल्यात सामनावीर म्हणून देखील घोषित केले होते. धोनीच्या या खेळीच्या बदल्यात भारतीय संघाने तो सामना ६ गडी राखून अगदी सहजपणे जिंकला होता. तो दिवस भारतीय संघासाठी अविस्मरणीय म्हणून ओळखला जात आहे. सध्या सोशल मीडियावर धोनीच्या या खेळीची खूप चर्चा रंगली असून, भारतीय क्रिकेट बोर्डातर्फे (BCCI) धोनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

- Advertisement -

धोनीच्या आठवणींना उजाळा देत BCCI ने त्याच्या विक्रमी खेळीचे कौतुक करत चाहत्यांना त्या सामन्याची आठवण करून दिली आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असून देश विदेशातील धोनीच्या चाहत्यांकडून त्याच्या खेळीचे कौतुक होत आहे. खुद्द BCCI कडून धोनीच्या या खेळीची माहिती प्रसारित झाल्यानंतर देशविदेशातील आजी माजी खेळाडू देखील “धोनी एज द बेस्ट”अशा प्रतिक्रिया देत आहेत.

धोनीने असा केला होता विक्रम

धोनीने १४५ चेंडूत १८३ धावा करत हा विक्रम आपल्या नावावर केला होता. त्यात १५ चौकार आणि १० षटकारांचा समावेश आहे. धोनीला भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून देखील ओळखले जाते. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने २०११ चा एकदिवसीय तर २००७ चा टी २० विश्वकप जिंकला होता तर अनेक नामांकित मालिका भारतीय संघाने त्याच्या नेतृत्वात जिंकल्या आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – Pak vs AFG : पाकचा विजय हा ‘इस्लाम’चा विजय, पाकच्या विजयाचे अफगाणिस्तानकडून सेलिब्रेशन


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -