घरक्रीडाबुमराहची जागा घेण्यासाठी पर्याय उपलब्ध!

बुमराहची जागा घेण्यासाठी पर्याय उपलब्ध!

Subscribe

सचिन तेंडुलकरचे मत

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार नाही. बुमराह सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याच्या अनुपस्थितीत इतर गोलंदाजांना त्यांचा खेळ उंचवावा लागणार आहे. भारताला बुमराहची उणीव नक्कीच भासेल, पण भारताकडे पर्याय उपलब्ध आहे, असे मत महान फलंदाज सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.

बुमराहसारख्या गोलंदाजांला जेव्हा दुखापतीमुळे मैदानाबाहेर रहावे लागते, तेव्हा त्याची उणीव नक्कीच भासते. मात्र, वेगवान गोलंदाजांमध्ये भारताकडे चांगले पर्याय उपलब्ध आहेत. तसेच आपल्याकडे उत्तम फिरकीपटू आहेत. त्यामुळे गोलंदाजीची चिंता करायची गरज नाही. बुमराहची भारताला उणीव भासेल.

- Advertisement -

मात्र, तो जर एखाद्या दुसर्‍या संघासाठी खेळत असता, तर त्याच्यासारख्या उत्कृष्ट गोलंदाजांची त्या संघाला जास्त उणीव भासली असती. परंतु, भारताच्या राखीव गोलंदाजांकडेही बराच अनुभव आहे आणि ते दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना अडचणीत टाकू शकतील, असे मला वाटते, असे सचिनने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -