IPL 2021 SRH vs DC : नॉर्टजेची ताशी १५१.७१ किमी वेगाने गोलंदाजी, ८ वेगवान चेंडूंचा विक्रम

anrich nortjes

रिषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्सने केन विलिअमसन्सच्या सनरायझर्स हैद्राबादचा ८ विकेट्सने धुव्वा उडवला. पण या विजयामध्ये वेगवान गोलंदाज नॉर्टजेचे योगदानही महत्वाचे होते. नॉर्टजेने या सामन्यात १२ धाव देत २ विकेट्स मिळवल्या. त्याच्यासोबतच्या रबाडा आणि अक्सर पटेलचीही या सामन्यात साथ लाभली. यंदाच्या आयपीएलच्या हंगामात नॉर्टजे आपला दुसरा सामना दिल्लीसाठी खेळत आहे. आतापर्यंतच्या आयपीएलच्या हंगामात त्याने वेगवान पद्धतीने गोलंदाजी करत आठव्यांदा स्वतःच्याच वेगाचा विक्रम मोडला आहे. आतापर्यंत आठपेक्षा अधिकवेळा नॉर्टजेने ताशी १५० किमीपेक्षाही अधिक वेगाने गोलंदाजी केली आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात त्याने आठवा वेगवान चेंडू टाकला. त्याने या सामन्यात चार ओव्हरमध्ये १२ धावा देऊन २ विकेट्स काढल्या. (Overspeeding ka challan kato, akash chopra on anrich nortjes fastest 8 balls of ipl 2021)

नॉर्टजेने वेगवान पद्धतीने केलेल्या गोलंदाजीत ताशी १५१.७१ किमी वेगाचा चेंडू हा सर्वाधिक वेगाचा असा बुधवारच्या सामन्यात टाकला गेला. याआधी ताशी १५१.३७ किमी, १५०.२१ किमी, १४९.९७ किमी, १४९.२९ किमी, १४९.१५ किमी, १४८.७६ किमी या वेगाने जलद पद्धतीने त्याने गोलंदाजी केली आहे. या वेगवान गोलंदाजीमुळे माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने ओव्हर स्पिडिंग का चलान काटो #SeriousPace अशा आशयाचे ट्विट केले आहे.

नॉर्टजे आणि रबाडाच्या गोलंदाजीपुढे संपुर्ण सनरायझर्स हैद्राबादचा संघ हा पुर्णपणे ढेपाळला. अतिरिक्त बाऊन्स आणि वेगामुळे सनरायझर्स हैद्राबादची टॉप ऑर्डर पुर्णपणे कोसळली. या गोलंदाजीच्या जोरावरच दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला ८ विकेट्सने सहज विजय मिळवणे शक्य झाले.


हेही वाचा – IPL 2021 : SRH vs DC सनरायझर्स हैद्राबादचा टी नजराजन Covid-19 पॉझिटीव्ह