Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा पी.व्ही सिंधूची विजयी सुरूवात; दुखापतीमुळे सायना स्पर्धेतून बाहेर

पी.व्ही सिंधूची विजयी सुरूवात; दुखापतीमुळे सायना स्पर्धेतून बाहेर

Subscribe

भारताची स्टार बॅडमिंटनपट्टू पी.व्ही. ,सिंधूची फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजयाने सुरूवात झाली आहे

भारताची स्टार बॅडमिंटनपट्टू पी.व्ही. ,सिंधूची फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत ( सुपर ७५० दर्जा ) विजयाने सुरूवात झाली आहे. मात्र सायना नेहवालला दुखापतीमुळे तिच्या पहिल्या फेरीच्या लढतीच्या अर्ध्यातूनच माघार घ्यावी लागली आहे.

ऑलिम्पिक मध्ये २ वेळा पदक मिळवलेल्या पी.व्ही सिंधूने महिला एकेरी डेन्मार्कच्या जुली दवालचा याकोबसनला २१-१५, २१-१८ अशा फरकाने पराभव केला. तिसऱ्या मानांकित सिंधूचा दुसऱ्या फेरीत लिन ख्रिस्तोफरसनशी सामना होणार आहे. सायनाने दुखापतीमुळे जपानच्या सायाका ताकाशाही विरूध्दच्या सामन्यातून अर्ध्यातूनच माघार घेतली. त्या सामन्यात सायना ११-२१, २-९ अशा अंतराने पिछाडीवर असल्याची पहायला मिळाली. तर मिश्र दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा या जोडीने मॅथियस थ्यरी आणि माई सुरोलाचा २१-१९, २१-१५ अशा फरकाने पराभव केला.

- Advertisement -

तर पुरूष एकेरीच्या लक्ष्य सेनेने आर्यलंडच्या एनहात एनग्वेनवर २१-१०, २१-१६ असा विजय मिळवला. किदम्बी श्रीकांतला अग्रमानांकित केंटो विरूध्द २१-१८, २०-२२, १९-२१ अशा मोठ्या फरकाने पराभव स्विकारावा लागला. त्यासोबतच पारूपल्ली कश्यप आणि एच.एस. प्रणॉयचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे.


 

- Advertisement -
- Advertisement -
MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -