घरक्रीडाPak Vs Aus 1st ODI : ऑस्ट्रेलियन संघाच्या अडचणीत वाढ, कोरोना, दुखापतीने...

Pak Vs Aus 1st ODI : ऑस्ट्रेलियन संघाच्या अडचणीत वाढ, कोरोना, दुखापतीने खेळाडू हैराण

Subscribe

पाकिस्तान दौऱ्यावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाच्या अडचणी संपण्याचे नाव घेत नाहीत. दिवसेंदिवस ऑस्ट्रेलियन संघासमोरील आव्हाने ही वाढतच चालली आहेत. दोन्ही संघात पहिला एकदिवसीय सामना खेळला जात आहे. पण या सामन्याच्या आधीच कोरोना संक्रमणाचे संकट संघासमोर एक मोठे आव्हान ठरत आहे. ऑस्ट्रेलियन संघात आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. ऑस्ट्रेलियन संघात कोरोनाची लागण होण्याचे हे पहिले प्रकरण नाही. आता स्पिनर एश्टन एगरला कोरोनाची लागण झाली आहे. याआधी जोश इंगलिस यालाही कोरोनाची लागण झाली होती.

जोश इंगलिसला सध्या क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याच्यासोबत टीमचे फिजिओ ब्रॅंडन विल्सनलाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. आजच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाला ११ खेळाडूंची गरज होती. सध्या ऑस्ट्रेलियन संघासाठी अवघे १३ खेळाडूच या दौऱ्यासाठी उपलब्ध आहेत. कोरोनाच्या संक्रमणासोबतच ऑस्ट्रेलियन संघ हा दुखापतीचाही सामना करत आहे. ऑलराऊंडर मिशेल मार्शला दुखापत झाली आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यासाठी तो उपलब्ध नसणार आहे. तर स्टीव्ह स्मिथही दुखापतीमुळे दौऱ्यातून बाहेर पडला आहे.

- Advertisement -

वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स, जोश हेजलवुड, मिशेल स्टार्क, डेविड वॉर्नरला तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर विश्रांती देण्यात आली आहे. कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरोधात १-० असा विजय मिळवला आहे.

ऑस्ट्रेलियन संघाने तब्बल २४ वर्षांनंतर पाकिस्तान दौरा केला आहे. याआधी २००९ मध्ये श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक शेजारी राष्ट्रांनी तसेच जागतिक क्रिकेटमध्ये नावाजलेल्या संघांनी पाकिस्तान दौरा करणे टाळले होते. पण गेल्या दोन तीन वर्षात पाकिस्तानने पुन्हा एकदा आपली प्रतिमा सुधारत अनेक संघांना दौऱ्यासाठीचे निमंत्रण दिले होते. गेल्या काही काळात दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, बांग्लादेश, श्रीलंका या संघानी पाकिस्तानचा दौरा केला आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -