PAK vs AUS: स्टीव्ह स्मिथने श्रीलंकेच्या दिग्गज खेळाडूचा 12 वर्षे जुना विक्रम काढला मोडीत

भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. सचिनने 154 व्या डावात 8000 धावांचा टप्पा पूर्ण केला होता. याशिवाय वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज गारफिल्ड सोबर्सने 157व्या आणि टीम इंडियाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविडने 158व्या कसोटी डावात हा आकडा गाठला.

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 8000 धावा करणारा तो खेळाडू ठरला आहे. लाहोरमध्ये खेळल्या जात असलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत त्याने श्रीलंकेचा महान खेळाडू कुमार संगकाराचा 12 वर्ष जुना विश्वविक्रम स्टिव्ह स्मिथने मोडला. 32 वर्षीय स्मिथने त्याच्या 151व्या डावात (85 कसोटी) हा विशेष आकडा गाठला, तर संगकाराने 152 डावांमध्ये हा पराक्रम केला. या यादीत भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकर (154 डाव), गॅरी सोबर्स (157 डाव) आणि राहुल द्रविड (158 डाव) अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. सचिनने 154 व्या डावात 8000 धावांचा टप्पा पूर्ण केला होता. याशिवाय वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज गारफिल्ड सोबर्सने 157व्या आणि टीम इंडियाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविडने 158व्या कसोटी डावात हा आकडा गाठला.

मात्र, लाहोर कसोटीत स्मिथची कामगिरी विशेष ठरली नाही आणि त्याने या सामन्यात केवळ एक अर्धशतक झळकावले. त्याने पहिल्या डावात 169 चेंडूत 59 धावा केल्या तर दुसऱ्या डावात 27 चेंडूत फक्त 17 धावा केल्या. तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव 227/3 धावांवर घोषित केला आणि पाकिस्तानसमोर विजयासाठी 351 धावांचे लक्ष्य ठेवले. स्मिथच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 85 सामन्यांच्या 151 डावांमध्ये 59.77 च्या सरासरीने 8010 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 27 शतके आणि 36 अर्धशतकेही केली आहेत.

हा टप्पा गाठणारा ऑस्ट्रेलियाचा सातवा फलंदाज

स्टीव्ह स्मिथ हा 8,000 कसोटी धावा पूर्ण करणारा सातवा ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे. रिकी पाँटिंग (13,378), अॅलन बॉर्डर (11,174), स्टीव्ह वॉ (10,927), मायकेल क्लार्क (8,643), मॅथ्यू हेडन (8,625), मार्क वॉ (8,029) हे त्याच्या आधी या स्थानावर पोहोचले आहेत.