घरक्रीडाPAK vs WI Series : मालिकेवर कोरोनाचे सावट; खेळाडूंसह आणखी ५ जणांना...

PAK vs WI Series : मालिकेवर कोरोनाचे सावट; खेळाडूंसह आणखी ५ जणांना कोरोनाची लागण

Subscribe

वेस्टइंडीजच्या संघातील तीन खेळाडू आणि दोन सहयोगी स्टाफ सदस्यांचा कोरोना चाचणीतील अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सध्या सुरू असलेली पाकिस्तान आणि वेस्टइंडीजमधील मालिका अडचणीत सापडली आली आहे

वेस्टइंडीजच्या संघातील तीन खेळाडू आणि दोन सहयोगी स्टाफ सदस्यांचा कोरोना चाचणीतील अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सध्या सुरू असलेली पाकिस्तान आणि वेस्टइंडीजमधील मालिका अडचणीत सापडली आली आहे. यष्टीरक्षक शाइ होप, फिरकीपटू अकील हुसैन आणि हरफनमौला जस्टिन ग्रीव्हस यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तर सहकारी प्रशिक्षक रॉडी एस्टविक आणि संघाचे डॉक्टर अक्षय मानसिंग हे देखील कोरोना संक्रमित असल्याचे समोर आले आहे. क्रिकेट वेस्टइंडीजने एका निवेदनात म्हंटले की, “संक्रमित आलेले तिन्ही खेळाडू आगामी सामन्यात खेळू शकणार नाहीत आणि हे पाचही जण आयसोलेशनमध्ये राहतील. वैद्यकिय अधिकारी त्यांची देखभाल करतील, त्यांना १० दिवस आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल येईपर्यंत आयसोलेशनमध्ये राहावे लागेल”.

दरम्यान, वेस्टइंडीजचे आता एकूण सहा खेळाडू बाहेर झाले आहेत. त्यामध्ये डेव्हन थॉमस बोटाच्या दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. दोन्हीही बोर्डाचे अधिकारी गुरूवारी बैठक घेऊन सध्याच्या मालिकेच्या भविष्याबाबत निर्णय घेणार आहेत.

- Advertisement -

पाकिस्तानने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. तिसरा सामना गुरूवारी होणार आहे त्यानंतर एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. मात्र यापूर्वी वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेल आणि हरफनमौला रोस्टन चेस तसेच काइल मेयर्सदेखील कोरोना संक्रमित आढळल्याने टी-२० मालिकेतून बाहेर गेले होते.

टी-२० मालिकेत पाकिस्तानची आघाडी

वेस्टइंडीज आणि पाकिस्तानमध्ये १३ डिसेंबर पासून टी-२० आणि एकदिवसीय मालिकेला सुरूवात झाली. आतापर्यंत दोन्हीही संघामध्ये फक्त २ टी-२० सामने झाले आहेत. ज्यामध्ये पाकिस्तानच्या संघाला विजय मिळाला आहे. त्यानंतर दोन्हीही संघामध्ये १८ डिसेंबरपासून तीन एकदिवसीय मालिकेला सुरूवात होणार आहे. दरम्यान दोन्हीही मालिकेतील सर्व सहा सामने कराचीमध्ये होणार आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा :  http://Ashes Series AUS vs ENG 2nd Test : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का कमिन्स दुसऱ्या कसोटीतून बाहेर; स्मिथकडे कर्णधारपद


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -