घरक्रीडाPAK-W vs WI-W: पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय, भारताचा उपांत्य फेरीत जाण्याचा...

PAK-W vs WI-W: पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय, भारताचा उपांत्य फेरीत जाण्याचा मार्ग सोपा

Subscribe

महिला विश्व चषक २०२२ मध्ये वेस्ट इंडिजच्या संघाला ८ गडी बाद करुन पराभूत केलं आहे. पाकिस्तानने पहिल्यांदा या मालिकेत विजय मिळवला आहे. लागोपाठ ४ सामन्यात पराभवा स्वीकारल्यानंतर पाकिस्तानची टीम आता पुन्हा फॉर्ममध्ये आली आहे. हा संघ पूर्वीच उपांत्य फेरीतील शर्यतीमधून बाहेर झाला आहे. परंतु वेस्टइंडिजला पराभूत करुन भारताचा उपांत्य फेरीत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता भारतीय संघ आपल्या दोन सामन्यांतील एक सामना जिंकली तरी उपांत्य फेरीत पोहचू शकते.

पावसामुळे सामना २० षटकांचा करण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत वेस्ट इंडिजने ८९ धावा केल्या तर पाकिस्तानने १८.५ षटकात २ गडी गमावून ९० धावा उभारुन सामना आपल्या नावे केला आहे.

- Advertisement -

निदा डारची उत्ष्कृष्ट गोलंदाजी

पाकिस्तानच्या संघाने पहिल्यांदा नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निदा दारच्या नेतृत्वामध्ये पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. चार षटकांत चार विकेट घेतले आहेत. तिने २.५० इकॉनॉमी रेटने फक्त १० धावा केल्या आहेत. त्याशिवाय फातिमा, संधू आणि सोहेल यांना प्रत्येकी एक विकेट घेतली आहे. वेस्ट इंडिज संघाला निर्धारीत २० षटकांमध्ये ७ विकेट घेत ८९ धावा केल्या आहेत. डॉटिनने सर्वाधिक २७ आणि टेलरने १८ धावा केल्या. तर फ्लेचरने १२ धावांची खेळी केली. यांच्याशिवाय एकाही वेस्ट इंडिजच्या संघाला दुहेरी आकडा स्पर्श करता आला नाही.

पाकिस्तानच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी

वेस्ट इंडिजने पाकिस्तानच्या संघाला ९० धावांचे लक्ष्य दिले होते. लक्ष्याचा पाठलाग करत असताना पाकिस्तानच्या संघाने संयमी आणि समंजस फलंदाजी करत विजय मिळवला. यामध्ये पाकिस्तानने २ गडी गमावले. मुनीबा अलीने सर्वाधिक ३७ धावा केल्या आहेत. तर कर्णधार बिस्माह मारुफने नाबाद २० आणि सोहेलने २२ धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजसाठी फ्लेचर आणि सेलमानने एकएक विकेट घेतला आहे.

- Advertisement -

पाकिस्तानच्या विजयामुळे भारताचा मार्ग सोपा

ऑस्ट्रेलियाच्या संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य फेरीत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर उर्वरित दोन जागांसाठी भारत, वेस्ट इंडिज आणि इग्लंडचे उपांत्य फेरीत जाऊ शकतात. न्यूझीलंड, बांग्लादेश आणि पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीत पोहचू शकतो. परंतु याची शक्यता कमी आहे. वेस्ट इंडिजच्या पराभवाने भारताला फायदा झाला आहे. उरलेल्या दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया उपांत्य फेरीत प्रवेश करु शकते.

वेस्ट इंडिजने सहा सामने खेळले असून त्यांचे गुण ६ झाले आहेत. शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. हा सामना वेस्ट इंडित जिंकण्याची शक्यता कमी आहे. भारताच्या पारड्यात ४ गुण आहेत. तर उर्वरित दोन सामने दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेशविरुद्ध आहेत. भारताची धावगती इतर सर्व संघांपेक्षा चांगला आहे.


हेही वाचा : हरभजन सिंगची राजकीय इनिंग सुरू, आम आदमी पार्टी राज्यसभेवर पाठवणार

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -