घरक्रीडाPakistan Vs Australia 1st Test : पाकिस्तान-ऑस्ट्रेलियाचा पहिला कसोटी सामना ड्रॉ, ५...

Pakistan Vs Australia 1st Test : पाकिस्तान-ऑस्ट्रेलियाचा पहिला कसोटी सामना ड्रॉ, ५ दिवसांत घेतल्या १४ विकेट्स

Subscribe

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रावळपिंडी येथे खेळण्यात आलेला पहिला कसोटी सामना ड्रॉ ठरला आहे. अतिशय सपाट असणाऱ्या खेळपट्टीवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाच दिवसांच्या खेळात फक्त १४ विकेट पडल्या आहेत. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा पहिला डाव ४७६/४ धावसंख्येवर संपुष्टात आला. त्यानंतर ऑस्ट्रेलियानेही ४५९ धावा केल्या. पाचव्या आणि शेवटच्या दिवशी पाकिस्तानने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता २५२ धावा केल्या आणि सामना ड्रॉ घोषित करण्यात आला. दुसरा कसोटी सामना १२ मार्चपासून कराचीत खेळवला जाणार आहे.

पाकिस्तानने झळकावली चार शतकं

या कसोटी सामन्यात पाकिस्तानने चार शतकं झळकावली आहेत. सलामीवीर ओपनर इमाम-उल-हकने दोन्ही डावात शतकं झळकावली. त्याने पहिल्या डावात १५७ तर दुसऱ्या डावात १११ नाबाद धावा केल्या. अजहर अलीने पहिल्या डावात १८५ धावा केल्या. दुसरा सलामीवीर अब्दुल्ला शफीकने दुसऱ्या डावात १३६ नाबाद धावांची खेळी केली.

- Advertisement -

उस्मान ख्वाजा आणि लॅबुशेन

ऑस्ट्रेलियासाठी या कसोटीत एकाही फलंदाजाला शतक झळकावता आले नाही. सलामीवीर उस्मान ख्वाजाने ९७ आणि मार्नस लॅबुशेनने ९० धावा केल्या. स्टीव्ह स्मिथने ७८ धावा केल्या.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लियॉन, पॅट कमिन्स आणि मार्नस लॅबुशेन यांनी १-१ विकेट घेतली. त्याचवेळी पाकिस्तानकडून फिरकीपटू नोमान अलीने ६ विकेट्स घेतले. शाहीन शाह अफ्रिदीला २ विकेट्स मिळाले. साजिद खान आणि नसीम शाह यांनी १-१ विकेट घेतली.

- Advertisement -

हेही वाचा : Maharashtra Assembly Budget Session 2022 : महाराष्ट्राच्या हद्दीतील पाणी गुजरातला देण्याचा प्रश्न उद्भवत नाही – जयंत पाटील


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -