आशिया कप २०२२ साठी पाकिस्तानचा संघ जाहीर; नव्या खेळाडूंना संधी

आशिया खंडासाठी महत्वाची मानली जाणारी आशिया कप २०२२ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या आशिया कपमध्ये एकूण पाच संघ एकमेकांचा सामना करणार आहे. तसेच, या कपसाठी स्पर्धेतील पाचही संघानी सरावाला सुरूवात केली आहे.

आशिया खंडासाठी महत्वाची मानली जाणारी आशिया कप २०२२ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या आशिया कपमध्ये एकूण पाच संघ एकमेकांचा सामना करणार आहे. तसेच, या कपसाठी स्पर्धेतील पाचही संघानी सरावाला सुरूवात केली आहे. अशातच वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानने आपला संघाची घोषणा केली आहे. या संघामध्ये पाकिस्तानने नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. (Pakistan announced team for for t20 Asia cup 2022 and Netherlands odis)

आशिया कप २०२२ चे वेळापत्रक जाहीर झाले असून, बीसीसीआय सचिव जय शाहा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. वेळापत्रकानुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये २८ ऑगस्टला सामना होणार आहे.

पाकिस्तानने आशिया कप २०२२ साठी संघाची घोषणा केली आहे. पाकिस्तानच्या संघात एकूण १५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तसेच, या संघाचे नेतृत्व बाबर आजमच्या हाती देण्यात आले आहे. स्पर्धेच वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानने संघाची निवड केली.

आशिया कपसाठी संघ निवडण्याशिवाय पाकिस्तानने नेदरलँडस विरुद्ध वनडे सीरीजसाठी सुद्धा १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. नेदरलँडस आणि पाकिस्तान मध्ये १६ ते २१ ऑगस्ट दरम्यान वनडे सीरीज होईल. आशिया कप २०२२ चे आयोजन २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान UAE मध्ये होईल.

पाकिस्तानने आपला युवा गोलंदाज नसीम शाहला नेदरलँडस आणि आशिया कप दोन्ही टीम्स मध्ये स्थान दिले आहे. हसन अलीच्या जागी त्याला ही संधी मिळाली आहे. त्याशिवाय दुखापतीमधून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या शाहीन शाह आफ्रिदीला दोन्ही संघात स्थान मिळाले आहे.

नेदरलँडस विरुद्ध वनडे सीरीजसाठी अब्दुल्लाह शफीक, इमाम उल-हक, मोहम्मद हॅरिस, सलमान अली आगा आणि जाहिद महमूदची निवड झालीय. आशिया चषकासाठीच्या संघात आसिफ अली, हैदर अली, इफ्तिकार अहमद आणि उस्मान कादिर यांची निवड केली आहे.

आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ

बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान, आसिफ इली, फख्र जमां, हैदर अली, हैरिस रउफ, इफ्तिकार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम जू., नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी, शाहनवाज दहानी, उस्मान कादिर.


हेही वाचा – कॉमनवेल्थ स्पर्धेत वेटलिफ्टर्सची जबरदस्त कामगिरी, विकास ठाकूरला रौप्यपदक