T20 World Cup 2022: पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर 33 धावांनी विजय

ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या टी20 विश्वचषक 2022 मध्ये पाकिस्तान संघाने दक्षिण आफ्रिकेवर 33 धावांनी विजय मिळवला आहे. पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेला 185 धावांचं आव्हान दिलं होतं. परंतु दक्षिण आफ्रिका संघाने 142 धावा केल्यामुळे त्यांना हा सामना जिंकण्यास यश मिळालं नाही. यावेळी देखील सामन्यामध्ये पावसाने व्यत्यय आणला होता. त्यामुळे आफ्रिकेसमोर 14 ओव्हर्समध्ये 142 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र, आफ्रिकेचा संघ 14 ओव्हर्समध्ये 9 गडी गमावून केवळ 108 धावाच करू शकला. त्यामुळे आफ्रिकेने हा सामना 33 धावांनी गमावला. या स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेचा हा पहिलाच पराभव आहे.

सर्वात प्रथम नाणेफेक जिंकत पाकिस्तान संघानं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पाकिस्तान संघाची सुरुवात तशी खास झाली नाही. परंतु पाकिस्तानचे वेगवान फलंदाज शादाब खान (52) आणि इफ्तिकार अहमदनं (51) अशी दमदार खेळी करत दोघांनीही अर्धशतकं झळकावली. या दोघांच्या फटकेबाजीमुळेच पाकिस्ताननं 185 धावांची झेप घेतली.

पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत दक्षिण आफ्रिकेच्या 9 फलंदाजांना बाद केलं. या दमदार विजयानंतर पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम आहे. मात्र, भारत किंवा दक्षिण आफ्रिका या दोघांपैकी एकाला आपला शेवटचा सामना गमवावा लागेल, अशी पाकिस्तानची अपेक्षा आहे. तरच पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करू शकेल.

पाकिस्तानचा पुढील सामना बांगलादेशविरुद्ध 6 नोव्हेंबरला आहे. जर पाकिस्तान संघाने हा सामना जिंकला तर त्यांना 6 गुण मिळतील. तसेच दोनपैकी कोणत्याही एका सामन्यात चमत्कार घडला तर बाबर आझमचा संघ उपांत्य फेरीत पोहोचेल.


हेही वाचा : IPL 2023 : शिखर धवन पंजाब किंग्ज संघाचा नवा