Maharashtra Assembly Election 2024
घरक्रीडाPakistan : भगव्या टोप्या घालून मैदानात उतरला पाकिस्तानचा संघ; हे आहे कारण...

Pakistan : भगव्या टोप्या घालून मैदानात उतरला पाकिस्तानचा संघ; हे आहे कारण…

Subscribe

नवी दिल्ली : पाकिस्तानचा क्रिकेट संघ हा विविध कारणांनी नेहमीच चर्चेत असतो. मग तो संपूर्ण संघ असो किंवा संघातील खेळाडू, नाहीतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. असाच प्रकारे पुन्हा एकदा पाकिस्तानचा संघ चर्चेत आला आहे. एकीकडे चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 ट्रॉफीच्या आयोजनावरून बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये मतभेत असताना दुसरीकडे पाकिस्तानच्या संघाने नवा पराक्रम केला आहे. पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यात पाकिस्तानच्या संघाने भगवी टोपी घातल्याचे अनेक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले. त्यामुळे पाकिस्तानच्या संघाला पुन्हा एकदा चांगलेच ट्रोल करण्यात आले. (Pakistan cricket team waring saffron caps ODI series against Zimbabwe photo viral)

हेही वाचा : IPL 2025 : अवघ्या 13 वर्षांच्या या खेळाडूसाठी लागली एवढी बोली; असे पहिल्यांदाच घडले 

- Advertisement -

रविवारी (24 नोव्हेंबर) बुलावायो येथे झालेल्या झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा संघ हा भगव्या रंगाच्या टोप्या घालून मैदानात उतरला. इतरवेळी पाकिस्तानचा संघ हा गडद हिरव्या रंगाची टोपी घालतात. यावेळी चाहत्यांनी गेल्या वर्षीच्या झालेल्या विश्वचषकातील एका प्रसंगाची आठवण करून दिली. स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ हा भारतात आला होता. तेव्हा त्यांचे स्वागत हे भगव्या रंगाचे मफलर देत करण्यात आले होते. मात्र, यावेळी त्यांनी तो गळ्यामध्ये घालण्यासदेखील नकार दिला होता. त्यामुळे आता त्यांनी परिधान केलेल्या भगव्या टोप्यांची चांगलीच चर्चा झाली.

नेमकं कारण काय?

पाकिस्तानचा संघ हा एकदिवसीय मालिकेसाठी झिम्बाब्वे येथे आहे. 3 सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेमधील पहिल्या सामन्यात दोन्ही संघांनी भगव्या रंगाच्या टोप्या परिधान केल्या होत्या. कर्करोग जागृतीसाठी योगदान उं उद्देशाने ही कल्पना वापरली गेली आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, या उपक्रमाचा उद्देश कर्करोगाने बाधित मुलांशी एकता दाखवणे आणि त्यांच्या कल्याणासाठी जागरुकता वाढवणे असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही संघांनी मैदानात प्रवेश करताच भगव्या टोप्या परिधान केल्या. त्यामुळे सर्वांचेच लक्ष याकडे गेले. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर भारतीय क्रीडाप्रेमींनी त्यांना चांगलेच ट्रोल केले.


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -