घरक्रीडाशाहीद आफ्रिदीला पाचवी मुलगी; ‘बास्केटबॉलची टीम झाली आता क्रिकेटची टीम बनवतोस का?’

शाहीद आफ्रिदीला पाचवी मुलगी; ‘बास्केटबॉलची टीम झाली आता क्रिकेटची टीम बनवतोस का?’

Subscribe

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी याला पाचवी मुलगी झाल्यामुळे त्याला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी याला आता पाचवे कन्यारत्न झाले आहे. त्याने आपल्या मुलींसह पाचव्या मुलीचा फोटो ट्विटरवर पोस्ट करत आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे. ‘आपल्याला पाचवी मुलगी झाल्याने आपण आनंदी आहोत’, असे शाहिदने ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे. मात्र, त्याच्या या पोस्टवरुन नेटकऱ्यांनी त्याची चांगलीच फिरकी घेतली आहे. अनेकांनी त्याला कुटुंब नियोजनाचे सल्ले देखील दिले आहेत.

- Advertisement -

काय म्हणाला शाहीद आफ्रिदी?

‘अल्लाहच्या कृपेने आणि आशीर्वादाने मला चार कन्यारत्न आहेत आणि आता पाचवीही मुलगी झाली आहे. मी तिचा फोटो माझ्या चाहत्यांकरता शेअर करत आहेत. तसेच मला पाचवी मुलगी झालेलाचा फार आनंद झाला आहे. माझ्या चाहत्यांना ही बातमी मी फोटोद्वारे देत आहे’. #FourbecomeFive, असेही त्याने लिहिले आहे. १२ तासांपूर्वी शेअर केलेल्या या फोटोला ५ हजारांच्यावर रिट्विट्स आले आहेत. तर ४० हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. मात्र, शाहीद आफ्रिदीला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे.

काय म्हणाले नेटकरी?

शाहीद आफ्रिदीने शेअर केलेल्या फोटोला नेटकरी म्हणाले आहेत की, ‘शाहीद आफ्रिदी तुला क्रिकेट टीम तयार करायची आहे का? आता बास्केटबॉलची टीम तर झाली आहे आता क्रिकेट टीम बनवायची आहे का?,असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच तुला कुटुंब नियोजनाची गरज आहे. तु थोडातरी बायकोचा विचार कर’, असे एक ना अनेक सल्ले नेटकऱ्यांनी शाहिद आफ्रिदीला दिले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – चार महिन्यात २६ किलो वजन घटवलं; सानिया मिर्झाचं जबरदस्त कमबॅक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -