घरक्रीडापाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकला हृदयविकाराचा झटका

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकला हृदयविकाराचा झटका

Subscribe

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकला हृदयविकाराचा झटका आला आहे. सोमवारी इंझमामवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रीयेनंतर इंझमामची प्रकृती स्थिर असून त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.

इंझमामला गेल्या काही दिवसांपासून छातीत दुखत होतं. यानंतर त्याच्या चाचण्या घेण्यात आल्या असता सर्व अहवाल सामान्य आले. मात्र, सोमवारी करण्यात आलेल्या चाचणीमध्ये त्याला हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याचं निष्पन्न झालं. यानंतर इंझमामला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्याच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्याच्या प्रवक्त्याने दिलीय.

- Advertisement -

५१ वर्षीय इंझमाम हा पाकिस्तानसाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. इंझमामने ३७५ सामन्यांमध्ये एकूण ११ हजार ७०१ धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये ११९ सामन्यांमध्ये त्याने ८ हजार ८२९ धावा केल्यात. तो पाकिस्तानच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. २००७ साली इंझमाम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला.

निवृत्तीनंतर त्याने पाकिस्तान क्रिकेटशीसंबंधित अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. तो आधी पाकिस्तानच्या संघासाठी फलंदाजी सल्लागार होता. नंतर २०१६ ते २०१९ दरम्यान तो पाकिस्तानी संघ निवडणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा प्रमुख निवडकर्ता म्हणून कार्यरत होता. इंझमामने अफगाणिस्तानचा मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम केलं आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -