घरक्रीडापाकिस्तानात भारतीय संघ खेळणार नाही; BCCIचे सचिव जय शाहांचे स्पष्ट मत

पाकिस्तानात भारतीय संघ खेळणार नाही; BCCIचे सचिव जय शाहांचे स्पष्ट मत

Subscribe

आगामी आशिया चषक 2023 पाकिस्तानात होणार असल्याची माहिती समोर येत भारताने याबाबत आपले स्पष्ट मत जाहीर केले आहे. आशिया चषक 2023 पाकिस्तानात होणार असल्याचं समोर आल्यानंतर भारत या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार नाही अशी स्पष्ट घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाहा यांनी केली आहे.

आगामी आशिया चषक 2023 पाकिस्तानात होणार असल्याची माहिती समोर येत भारताने याबाबत आपले स्पष्ट मत जाहीर केले आहे. आशिया चषक 2023 पाकिस्तानात होणार असल्याचं समोर आल्यानंतर भारत या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार नाही अशी स्पष्ट घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाहा यांनी केली आहे. तसेच, ही आशिया स्पर्धा दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी घ्यावी, अशी मागणी शाहा यांनी केली. (pakistan not to host asia cup 2023 tournament on neutral venue says jay shah)

बीसीसीआयच्या सर्वसाधारण सभेत जय शाह यांनी ही घोषणा केली. बीसीसीआयचे 36 वे अध्यक्ष 1983 च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य आणि माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी झाले असून, या निर्णयासाठी बीसीसीआयची 91 वी सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी इतरही विषयांवर चर्चा झाली.

- Advertisement -

भारत आणि पाकिस्तान या 2 संघांमधील सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता असते. भारत आणि पाकिस्तान विश्वचषक आणि आशिया चषक व्यतिरिक्त वनडे, कसोटी, टी-20 मालिका एकमेकाविरोधात खेळत नाहीत. भारत 2005-06 नंतर एकदाही पाकिस्तानत सामना खेळण्यासाठी गेलेला नाही. भारत आणि पाकिस्तान देशांतील संबंध चांगले नसल्याने दोघेही एकमेंकाचा दौरा करत नाहीत.

भारताचा विचार करता भारतीय संघ राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली 2005-06 मध्ये अखेरचा पाकिस्तानचा दौरा केला होता. 2012-13 मध्ये पाकिस्तान भारताच्या दौऱ्यावर आला होता, त्यानंतर जवळपास 10 वर्षे झाल्यानंतरही दोन्ही संघ एकमेंकाच्या भूमीवर क्रिकेट खेळलेले नाहीत. केवळ आयसीसी स्पर्धां आणि आशिया चषक स्पर्धेतच दोघेही एकमेंकाविरुद्ध आमने-सामने येतात. आता भारत-पाकिस्तान 23 ऑक्टोबर रोजी टी20 विश्वचषक स्पर्धेमध्ये आमने-सामने येणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – कगिसो रबाडाने हिंदीतून केली सासू-सासऱ्यांची मनधरणी, व्हिडीओ व्हायरल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -