घरक्रीडावनडे संघ क्रमवारीत पाकिस्तान भारताच्या एक पाऊल पुढे

वनडे संघ क्रमवारीत पाकिस्तान भारताच्या एक पाऊल पुढे

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाला (Indian Cricket Team) मागे टाकत पाकिस्तान संघाने (Pakistan Cricket Team) वनडे संघ क्रमवारीत (ODI Team Ranking) चौथे स्थान पटकावले आहे. सध्या पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील मालिकेत पाकिस्तानने ३-० ने वनडे मालिका जिंकली.

भारतीय क्रिकेट संघाला (Indian Cricket Team) मागे टाकत पाकिस्तान संघाने (Pakistan Cricket Team) वनडे संघ क्रमवारीत (ODI Team Ranking) चौथे स्थान पटकावले आहे. सध्या पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील मालिकेत पाकिस्तानने ३-० ने वनडे मालिका जिंकली. या मालिका विजयामुळे पाकिस्तानचा संघ एकदिवसीय संघ क्रमवारीत भारतापेक्षा वरचढ ठरला आहे. पाकिस्तानने १०६ रेटिंग गुणांसह चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे, तर भारत आता १०५ रेटिंग गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. (Pakistan overtake India in the odi team rankings)

मुलतान येथे झालेल्या पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज याच्या मालिकेत पाकिस्तानचा दमदार विजय झाला. या विजयामुळे पाकिस्तानचे वनडे रेटींग गुण १०६ झाले. या मालिकेपूर्वी पाकिस्तान १०२ रेटिंग गुणांसह पाचव्या स्थानावर होता. ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये पाकिस्तानने गेल्या काही वर्षांत दमदार कामगिरी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – वेस्ट इंडिजचे खेळाडू मास्क लावून खेळले सामना, प्रेक्षकांमध्ये कोरोनाची चर्चा

होम ग्रांउडशिवाय इंग्लंड झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) चांगली कामगिरी केली आहे. १९९८ नंतर पहिल्यांदाच पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाला (Australia) पाकिस्तानमध्ये पराभूत व्हावे लागले. दरम्यान, कर्णधार बाबर आझमच्या (Baber Azam) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघ सध्या उत्तम कामगिरी करत आहे. बाबरने आतापर्यंत खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये पाकिस्तानला आघाडीवर ठेवले आहे.

- Advertisement -

भारतीय संघ सध्या वनडे क्रमवारीत पाकिस्तानच्या मागे असला तरी भारताला लवकरच पुढे जाण्याची संधी आहे. कारण इंग्लंड आणि वेस्ट इंडिज विरुद्ध भारताला खेळायचे आहेत. पाकिस्तानची पुढील एकदिवसीय मालिका ऑगस्टमध्ये आहे. त्यामुळे भारत अधिक गुणांसह पाकिस्तानला मागे टाकू शकते.


हेही वाचा – मी आता डिझर्व्ह करत नाही.., भारतीय संघात एन्ट्री मिळाल्यानंतर आयपीएल स्टारचं मोठं वक्तव्य

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -