घरक्रीडाPakistan Player Abid Ali : PAK खेळाडूला फलंदाजी दरम्यान दोनदा छातीचा त्रास;...

Pakistan Player Abid Ali : PAK खेळाडूला फलंदाजी दरम्यान दोनदा छातीचा त्रास; सामना अर्ध्यातूनच सोडला, रुग्णालयात दाखल

Subscribe

पाकिस्तानच्या कसोटी संघाचा सलामीवीर आबिद अलीच्या प्रथम श्रेणी टूर्नामेंट कायद-ए-आझम ट्रॉफी दरम्यान अचानक छातीत दुखू लागल्याने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

पाकिस्तानच्या कसोटी संघाचा सलामीवीर आबिद अलीच्या प्रथम श्रेणी टूर्नामेंट कायद-ए-आझम ट्रॉफी दरम्यान अचानक छातीत दुखू लागल्याने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान स्पर्धेत मध्य पंजाब कडून खेळणाऱ्या आबिदच्या दोन वेळा छातीत दुखू लागले. त्यानंतर त्याच्या संघाचे मॅनेजर अशरफ अली यांनी त्याला लगेचच इस्पितळात दाखल केले आणि चाचणी करण्याचे ठरवले. माजी कसोटी विकेटकिपर फलंदाज अशरफने म्हटले की, “तो आज (मंगळवारी) सकाळी ६१ धावा करून खेळत होता, जेव्हा त्याने दोनदा छातीत दुखत असल्याचे सांगितले तेव्हा आम्हाला वाटले की त्याला इस्पितळात दाखल करणे चांगले होईल. आता तिथे त्याची चाचणी सुरू आहे आणि त्याचे आणखी काही कसोटी सामने होणार आहेत”.

यूबीएल कॅम्पसमध्ये खैबर पख्तूनख्वा संघाविरुद्ध खेळताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ९००० धावा पूर्ण करणारा आबिद हॉल, नुकताच बांगलादेशच्या यशस्वी ठरलेल्या कसोटी दौर्‍यानंतर मध्य पंजाब संघासोबत जोडला गेला आहे.

- Advertisement -

आबिद अलीसाठी २०२१ हे वर्ष शानदार राहिले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ६९५ धावा केल्या आहेत आणि या दरम्यान त्याची सरासरी जवळपास ५० राहिली आहे. दरम्यान आबिद अलीने या वर्षी २ शतक आणि २ अर्धशतके झळकावली आहेत.

- Advertisement -

मागील काही दिवसांत पाकिस्तानचा संघ बांगलादेश दौऱ्यावर होता. तेव्हा सलामीवीर फलंदाज आबिद अलीने शानदार प्रदर्शन केले होते. ३४ वर्षीय आबिदने ८८ च्या सरासरीने २६३ धावा केल्या होत्या आणि सामनावीर पुरस्कार देखील पटकावला होता. त्याने पाकिस्तानसाठी १६ कसोटीतील २६ डावात ४९ च्या सरासरीने ११८० धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने ६ एकदिवसीय सामन्यांत एक शतक आणि एक अर्धशकासोबत २३४ धावा केल्या आहेत.


हे ही वाचा: http://IND vs SA : कसोटी मालिकेपूर्वी यजमान संघाला मोठा झटका; दुखापतीमुळे हा स्टार गोलंदाज बाहेर


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -