घरक्रीडावाईट वेळही निघून जाईल.., विराट कोहलीच्या समर्थनार्थ पाकिस्तानच्या बाबर आझमचं मोठं वक्तव्य

वाईट वेळही निघून जाईल.., विराट कोहलीच्या समर्थनार्थ पाकिस्तानच्या बाबर आझमचं मोठं वक्तव्य

Subscribe

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या वाईट परिस्थितीतून जात आहे. कारण कोहली खराब फॉर्ममध्ये असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे. इंग्लंडच्या दौऱ्यात विराटने एकही शतक ठोकलेलं नाहीये. त्यामुळे त्याच्या फॉर्मबाबत चाहत्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अशातच वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून विराट कोहलीच्या जागी नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने ट्विट करत विराट कोहलीच्या समर्थनार्थ मोठं वक्तव्य केलं आहे.

पाकिस्तानच्या बाबर आझमचं मोठं वक्तव्य

कर्णधार बाबर आझमने ट्विट करत विराट कोहलीची पाठराखण केली आहे. बाबर आझमने विराट कोहलीसोबत एक फोटो शेअर केला आहे. ही वाईट वेळही निघून जाईल, असा पाठराखण करणारा संदेश आझमने दिला आहे. त्यामुळे त्यांच्या या मैत्रीचे आणि ट्वीटचे क्रिकेटप्रेमींनी कौतुक केले आहे.

- Advertisement -

भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचं युद्धाचं वातावरण असतं. परंतु बाबर आझमने ट्विट करत विराट कोहलीची पाठराखण केली आहे. त्यामुळे देशातील ताणावाच्या वादापेक्षा मित्रता महत्त्वाची असल्याचं दिसून आलं आहे. बाबर आझमच्या या ट्विटला लाखो लोकांनी लाईकही केलं आहे.

- Advertisement -

कठीण काळात सौरव गांगुलीचा कोहलीला पाठिंबा

सौरव गांगुली यांनी याबाबत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटचे आकडे इतर खेळाडूंपेक्षा जास्त आहेत. होय, त्याच्यावर सध्या कठीण वेळ आली आहे. तो चांगल्या फॉर्ममध्ये नसल्याचं त्याला देखील माहितीये. मात्र, तो स्वतः एक महान खेळाडू आहे, हे देखील त्याला माहीत आहे. मला वाटते की, तो लवकरच फॉर्ममध्ये येईल आणि उत्कृष्ट फलंदाजी करेल, असं सौरव गांगुली म्हणाले.

विराट कोहलीला डच्चू

दरम्यान, इंग्लंड दौऱ्यानंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाने आपला संघ जाहीर केला आहे. यामध्ये रोहित शर्माची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. तर विराट कोहलीला डच्चू देण्यात आला आहे.


हेही वाचा : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत रोहित शर्मा कर्णधार, कोहलीला


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -