घरक्रीडाSiddhartha Lahiri : रोहित आर्मीला घाबरवण्यासाठी इंग्लंडने मागवला पाकिस्तानी खेळाडू; त्याचा कोच...

Siddhartha Lahiri : रोहित आर्मीला घाबरवण्यासाठी इंग्लंडने मागवला पाकिस्तानी खेळाडू; त्याचा कोच भारतीय

Subscribe

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला येत्या 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे सुरूवात होणार आहे. मात्र त्याआधी पहिल्या कसोटी भारताला अवघ्या 28 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. तसेच भारतीय फलंदाज इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजाविरुद्ध अधिक संघर्ष करताना दिसले. अशातच आता ब्रेंडन मॅक्युलमने रोहित आर्मीला घाबरवण्यासाठी आणखी एका फिरकीपटूला संघात सामील केले आहे. पाकिस्तानी वंशाचा असलेला शोएब बशीर हा भारतात परतला असून त्याचे प्रशिक्षक भारतीय असल्याची माहिती समोर येत आहे. (Pakistan spinner Shoaib Bashir called by England to scare Rohit Army His coach is Indian Siddharth Lahiri)

हेही वाचा – Babanrao Taywade : ओबीसीत फूट? भुजबळ, वडेट्टीवार दिशाभूल करतायत; तायवाडेंच्या आरोप

- Advertisement -

शोएब बशीर हा भारतात पोहोचल्यानंतर इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम आनंदी झाल्याचे पाहायला मिळत आहेत. याशिवाय विशाखापट्टणममध्ये भारत विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत गरज पडल्यास फिरकीपटूंची फौज उतरवली जाईल, असेही ब्रेंडन मॅक्युलम यांनी स्पष्ट केले आहे. तसेच शोएब बशीर याची इंग्लंड संघात निवड झाल्यानंतर त्याचे प्रशिक्षक सिद्धार्थ लाहिरी यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या शिष्याचे कौतुक करताना म्हटले की, शोएब बशीर हा चांगला फिरकीपटू आहे. मी खात्रीने सांगू शकतो की, तो डोळ्यावर पट्टी बांधूनही गोलंदाजी करू शकतो. येत्या काळात तो प्रसिद्ध होईल, असा विश्वासही सिद्धार्थ लाहिरी यांनी व्यक्त केला आहे.

सिद्धार्थ लाहिरी कोण?

माध्यमातील वृत्तानुसार, 2003 मध्ये सिद्धार्थ लाहिरी हे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) याठिकाणी कोचिंग बॅज गोळा करण्यासाठी लंडनमध्ये गेले होते. त्यांनी मिडलसेक्समध्ये असताना इसीबीच्या स्तर 1 आणि 2 ची परीक्षा पास केली. यानंतर काउंटीने स्तर 3 साठी त्यांच्या नावाची शिफारस केली. लेव्हल 3 पूर्ण केल्यानंतर सिद्धार्थ लाहिरी कोचिंगच्या संधी शोधत होते. यावेळी त्यांना कोबहॅम, सरे येथील स्टोक डी’अबरनॉन सीसी क्लबमध्ये संधी मिळाली. यानंतर त्यांना पार्कसाइड स्कूल कोभम याठिकाणी पहिला ब्रेक मिळाला आणि त्यानंतर त्यांनी स्टार क्रिकेट अकादमी सुरू केली. सध्या सिद्धार्थ लाहिरी हे इंग्लंडच्या रॉयल अकादमीचे प्रमुख आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Maratha Vs OBC : छगन भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा; शिंदे गटातील दोन आमदारांची मागणी

शोएब बशीर मिळणार पदार्पणाची संधी?

दरम्यान, बुधवारच्या प्रशिक्षण सत्रात जैक लीच लंगडताना दिसून आला होता. पहिल्या सामन्यात त्याच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती, त्यामुळे तो जास्त गोलंदाजी करू शकला नाही. याशिवाय आज इंग्लंड संघाच्या सराव सत्रातही तो सहभागी झाला नाही. तो सध्या फिजिओकडून उपचार घेत आहे. त्यामुळे जैक लीच दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल तर त्यांच्याजागी ऑफस्पिनर शोएब बशीरला कसोटीत पदार्पणाची संधी मिळू शकते. त्यामुळे भारतीय फलंदाजासमोर तो कितपत यशस्वी होईल, हे पाहावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -