Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा IND vs PAK मालिकेसाठी पाकिस्तानने सुचवली 'या' देशांची नावे; BCCI ने दिले...

IND vs PAK मालिकेसाठी पाकिस्तानने सुचवली ‘या’ देशांची नावे; BCCI ने दिले उत्तर

Subscribe

नवी दिल्ली : आगामी २०२३चा आशिया चषक पाकिस्तानात होणार आहे, मात्र क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) सुरक्षेच्या कारणास्तव जाण्यास नकार दिल्यामुळे वाद सुरू आहे. अशातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय कसोटी मालिका व्हायला हवी असे म्हणत त्यांनी तीन देशांची नावे सुचवली आहेत. मात्र बीसीसीआयने त्यांची मागणी फेटाळून लावली आहे.

भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर जगाचे लक्ष लागलेले असते. हे कट्टर प्रतिस्पर्धी आयसीसीच्या आणि आशिया चषक स्पर्धांमध्येच आमनेसामने येतात. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा मालिका सुरू व्हावी यासाठी पाकिस्तानमधील माजी क्रिकेटपटू वारंवार मागणी करताना दिसतात. आत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी (Najam Sethi) यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका व्हायला हवी, असे मत व्यक्त करताना त्यांनी कसोटी मालिकेसाठी तीन देशांची नावे सुचवली आहे.

- Advertisement -

पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यात डिसेंबर 2007 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यामुळे या दोन्ही संघात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड किंवा दक्षिण आफ्रिका या देशात द्विपक्षीय कसोटी सामने खेळवले जाऊ शकतात आणि खासकरून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे देश मालिकेसाठी अधिक योग्य ठरू शकतात, असे सेठी म्हणाले.

- Advertisement -

खेळायला न येण्याच्या समस्येचा अंत नाही
सेठी म्हणाले की, “जर भारतीय संघ आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये आला नाही, तर माझे सरकार मला सांगेल की, भारतात अशाच प्रकारच्या सुरक्षा समस्या आहेत, त्यामुळे तुम्ही विश्वचषक खेळण्यासाठी भारतात जाऊ नका. विश्वचषकानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे आणि ती पाकिस्तानने आयोजित केली आहे. अशावेळी भारताने पाकिस्तानमध्ये खेळायला येण्यास नकार दिला, तर खेळायला न येण्याच्या या समस्येचा अंत नाही.

बीसीसीआयने मागणी फेटाळली
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी सुचवलेला पर्याय बीसीसीआयने फेटाळली आहे. बीसीसीआयने भविष्यात किंवा आगामी काळात दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारच्या द्विपक्षीय मालिकेसाठी आम्ही तयार नसल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे.

 

- Advertisment -