घरक्रीडाICC च्या महसूल वितरणावर पाकिस्तान नाराज; थेट भारताशी तुलना

ICC च्या महसूल वितरणावर पाकिस्तान नाराज; थेट भारताशी तुलना

Subscribe

नवी दिल्ली : आशिया चषक २०२३मुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाद सुरू असताना आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने (ICC) महसूल वितरण करताना भारताला झुकते माप दिल्यामुळे पाकिस्तानचा जळफळात झाला आहे. आयसीसीने भारताला 38.50 टक्के दिले आहेत, तर पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांना कमी सर्वात कमी महसूल दिला आहे.

इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल अथर्टन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) बैठकीत पुढील चार वर्षांसाठी (2024-2027) नवीन महसूल वाटणी योजनेवर मतदान होणार आहे. महसूल वितरणात भारतला मोठा वाटा दिल्यामुळे पाकिस्तानने टीका केली आहे. भारत खेळाचे आर्थिक इंजिन असल्यामुळे त्यांना सर्वात मोठा हिस्सा मिळाला पाहिजे हे मान्य केले होते, परंतु प्रस्तावित नवीन महसूल वितरण योजनेशी असहमत नसल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी सांगितले. सेठी म्हणाले की, आम्ही आग्रही आहोत की,  आयसीसीने आम्हाला हे आकडे कसे आले ते सांगावे. सध्या जशी परिस्थिती आहे त्याबद्दल आम्ही आनंदी नाही. जूनमध्ये आयसीसी आर्थिक मॉडेलला मंजुरी देणार आहे, परंतु ते जोपर्यंत सर्व तपशील आम्हाला सांगत नाहीत, तोपर्यंत आम्ही मंजूरी देणार नाही.

- Advertisement -

बीसीसीआय सचिव जय शाह यांच्या नेतृत्वाखालील महसूल समितीने हिस्सा कसा ठरवला हे पाकिस्तान बोर्डाने आयसीसीला आधीच विचारले असल्याचा दावा नजम सेठी यांनी केला आहे. किमान दोन आणि इतर कसोटी खेळणारे देश या आयसीसीच्या मॉडेलवर नाराज असून त्यांनी अधिक माहिती मागितली आहे. भारताला अधिक पैसे मिळायला पाहिजे, पण ही टक्केवारी कशी ठरवली जाते, असा प्रश्न सेठी यांनी आयसीसीला विचारला आहे.

भारताला मिळणार 38.50 टक्के
आयसीसीच्या नवीन महसूल मॉडेलवर भारताला 38.50 टक्के म्हणजे चार वर्षांसाठी 600 दशलक्ष मिळतील. आयसीसीच्या आर्थिक आणि व्यावसायिक व्यवहार समितीने प्रस्तावित केलेले मॉडेल जूनमधील वार्षिक परिषदेत मंजूर झाले तर बीसीसीआयला दरवर्षी 231 दशलक्ष डॉलर्स मिळतील. त्यानंतर इंग्लंड 6.89 टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकवर असणार आहे आणि ऑस्ट्रेलियाला 6.25 टक्के मिळतील, तर पाकिस्तानला 5.75 टक्के मिळणार आहेत. आयसीसीच्या 96 सहयोगी सदस्यांना उर्वरित 2.89 टक्के आणि 12 पूर्ण सदस्यांना 88.81 टक्के एकत्रित वाटा मिळणार आहे.

- Advertisement -

डिस्ने हॉट स्टारमुळे भारत आघाडीवर
आशिया चषक २०२३ च्या नवीन महसूल मॉडेलला बांगलादेश आणि श्रीलंकेचा पाठिंबा मिळाला असल्यामुळे पाकिस्तान बोर्डाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आयसीसीच्या कमाईत भारताला अंदाजानुसार 80 टक्के मिळणार आहेत. डिस्ने हॉट स्टार जागतिक स्पर्धांच्या हक्कांसाठी सर्वाधिक पैसा खर्च करत असल्याने भारत यामध्ये आघाडीवर आहे. डिस्ने हॉट स्टारने पुढील चार वर्षांसाठी (2024-2027) भारतीय बाजारपेठेतील मीडिया अधिकार सुरक्षित करण्यासाठी गेल्या वर्षी 3 अब्ज डॉलर खर्च केले होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -