घर क्रीडा Pakistan vs Sri Lanka : मोहम्मद रिझवानची दमदार खेळी; पाकिस्तानचे श्रीलंकेसमोर 253...

Pakistan vs Sri Lanka : मोहम्मद रिझवानची दमदार खेळी; पाकिस्तानचे श्रीलंकेसमोर 253 धावांचे आव्हान

Subscribe

Pakistan vs Sri Lanka : आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) च्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आज सुपर फोरच्या सामन्यात पाकिस्तान (pakistan) आणि श्रीलंका (Sri lanka) यांच्यात सामना होत आहे. कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर सुरू असलेल्या सुपर-4 मधील 5 व्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेसमोर 253 धावांचे आव्हान दिले आहे. (Pakistan vs Sri Lanka Mohammad Rizwans powerful innings Pakistans challenge of 253 runs against Sri Lanka)

हेही वाचा – Mahendra Singh Dhoni : वानखेडे स्टेडियममधील दोन खुर्च्यांचा होणार लिलाव; धोनीशी आहे खास संबंध

- Advertisement -

अंतिम फेरीत पोहचण्याासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या आजच्या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पावसाच्या व्यातय्यामुळे सुरूवातीला सामना 45-45 षटकांनी निर्णय घेण्यात आला. पण त्यानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्यामुळे सामना 42-42 षटकांचा करण्यात आला. सामना सुरू झाल्यानंतर पाकिस्तानची सुरूवात खराब झाली. सलामीवीर फखर जमान अवघ्या अवघ्या 4 धावा करून बाद झाला.

 सलामीवीर इमामच्या जागी बदली खेळाडू आलेल्या सौदी शकील आणि कर्णधार बाबर आझमने दुसऱ्या विकेटसाठी 64 धावांची भागिदारी केली. मात्र त्यानंतर बाबर आझम 29 धावा करून बाद झाला आणि त्यानंतर सौदी शकीलही 69 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 52 धावा करू बाद झाला. मोहम्मद हॅरिस आणि मोहम्मद नवाज झटपट बाद झाल्यामुळे 130 धावांवर पाकिस्तानचा अर्धा संघ माघारी परतला होता.

- Advertisement -

हेही वाचा – ‘पृथ्वी शॉ’ च्या अडचणीत वाढ; दीर्घकाळासाठी क्रिकेटपासून राहावे लागणार दूर

28व्या षटकात पावसाने हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर रिझवान आणि इफ्तिखार अहमद यांच्यात सहाव्या विकेटसाठी 108 धावांची शतकी भागिदारी झाली. विशेष म्हणजे पाकिस्तान संघाने उर्वरित 14.2 षटकांत दोन गडी गमावून 130 धावा केल्या. त्यानंतर इफ्तिखार अहमद 40 चेंडूंत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 47 धावा करून बाद झाला. परंतु रिझवानने आपली एकाकी झुंज सुरूच ठेवली. त्याने नाबाद राहत 73 चेंडूंत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 86 धावांची दमदार खेळी केली. त्यामुळे पाकिस्तान संघाने निर्धारीत 42 षटकात 252 धावांचा डोंगर उभा केला आहे. श्रीलंकेकडून मथिसा पाथिरानाने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर प्रमोद मदुसनला 2 विकेट मिळाल्या.

- Advertisment -