Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आली तेव्हा माझी आई..., 'या' पाकिस्तानी खेळाडूने सांगितली...

दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आली तेव्हा माझी आई…, ‘या’ पाकिस्तानी खेळाडूने सांगितली हृदयस्पर्शी आठवण

Subscribe

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16 व्या वर्षी संधी मिळालेला नसीम शाह अल्पावधीतच पाकिस्तानी संघातील स्टार गोलंदाज झाला आहे. ब्रिस्बेन इथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात नसीमने पाकिस्तान संघातून पदार्पण केले. मात्र, नसीम शाहचा पदार्पणाचा दिवस अत्यंत कठीण होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16 व्या वर्षी संधी मिळालेला नसीम शाह अल्पावधीतच पाकिस्तानी संघातील स्टार गोलंदाज झाला आहे. ब्रिस्बेन इथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात नसीमने पाकिस्तान संघातून पदार्पण केले. मात्र, नसीम शाहचा पदार्पणाचा दिवस अत्यंत कठीण होता. नुकताच नसीम शाहने इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याला दिलेल्या मुलाखतीत पदार्पणाच्या दिवसाची आठवण सांगितली. नसीम शाहची ही आठवण ऐकून चाहतेही भारावले.

इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने नसीम शाह याला त्याच्या पदार्पणाचा पहिल्या दिवसाबद्दल प्रश्न विचारला. तेव्हा नसीम शाह भावूक झाला होता. तसेच, उत्तर देताना त्याने सांगितले की, “माझा आईवर खूप जीव होता. वयाच्या 12व्या वर्षी मी क्रिकेटसाठी घर सोडले आणि मी लाहोरला शिफ्ट झालो. मी ज्या दिवशी माझा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणार होतो, त्याच्या आदल्यादिवशी रात्रीच्यावेळी आईने मला फोन केला होता. तेव्हा मी तिला उद्या माझा पहिला सामना आहे असे सांगितले. माझ्या आईला कधी टीव्ही पाहायची फार आवड नव्हती. ती टीव्ही बघतही नव्हती. पण तू उद्या टीव्ही नक्की बघ. मी तुला खेळताना दिसेन, असे सांगितले. त्यावेळी ती जाम खूश झाली होती. त्यावेळी तिने मला सांगितले की, तुझी मॅच बघायला मी लाहोरला सुद्धा येईन. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मला जाग आली, तेव्हा माझी आई या जगात नसल्याचे मला कळले. आई गेल्यानंतरचे पुढचे ६ ते ८ महिने माझ्यासाठी खूप कठीण होते. मी खूप संघर्ष करत होतो. माझ्या मनात नेमके काय चालले हे कुणालाही कळू शकत नव्हते. मी औषधं घ्यायचो. मला सगळीकडे माझी आईच दिसायची. मी फक्त तिच्याबद्दलच विचार करायचो. पण तुम्ही जेव्हा देशासाठी खेळता, तेव्हा प्रत्येकाला तुमच्याकडून चांगल्या कामगिरी करण्याची अपेक्षा असते. त्या दिवसांत मी दुखापतींमुळंही खूप त्रस्त होतो. तो काळ खूप कठीण होता. त्यातून मला खूप काही शिकायला मिळाले. त्यामुळे आता मी मानसिकदृष्ट्या पूर्वीपेक्षा खूप मजबूत झालोय” त्याची आठवण ऐकल्यानंतर चाहत्यांसह सर्वच जण भावूक झाले.

- Advertisement -

दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16 व्या वर्षी संधी मिळालेला नसीम शाह अल्पावधीतच पाकिस्तानी संघातील स्टार गोलंदाज झाला आहे. दुखापतीमुळे सध्या त्याला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे पाकिस्तानी संघाला समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.


हेही वाचा – Budget 2023 मध्ये नोकरदारांना मिळणार तीन खास गिफ्ट

- Advertisement -
- Advertisement -
Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -