Homeक्रीडाPak VS WI : लग्न केले अन् रिसेप्शन सोडून जोडपे पोहचले क्रिकेट...

Pak VS WI : लग्न केले अन् रिसेप्शन सोडून जोडपे पोहचले क्रिकेट स्टेडियममध्ये

Subscribe

लग्नानंतर वधू आणि वर पुढील काही दिवस कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होताना दिसतात किंवा हनिमूनसाठी जातात. मात्र पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यादरम्यान लग्न केले केलेले एक जोडपे आपले रिसेप्शन सोडून चक्क क्रिकेट सामना पाहायला आल्याचे दिसून आले

नवी दिल्ली : लग्नानंतर वधू आणि वर पुढील काही दिवस कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होताना दिसतात किंवा हनिमूनसाठी जातात. मात्र पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यादरम्यान लग्न केले केलेले एक जोडपे आपले रिसेप्शन सोडून चक्क क्रिकेट सामना पाहायला आल्याचे दिसून आले. महत्त्वाचे म्हणजे ते दोघे त्यांच्या लग्नाच्या पोशाखात क्रिकेट स्डेडिवर पाकिस्तान संघाला सपोर्ट करताना दिसले. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Pakistani couple got married and left the reception and arrived at the cricket stadium)

क्रिकेट सामन्यादरम्यान, चाहते आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी वेगवेगळी वेशभूषा करताना दिसतात. मात्र पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यादरम्यान लग्न केलेले एक लग्नाच्या पोशाखात क्रिकेट स्टेडियमवर पोहचल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये असे दिसून येते की, वर हार घालून आला होता, तर वधू पूर्णपणे सजलेली होती. मेकअप केल्यामुळे तिचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होते. जेव्हा त्या दोघांना लग्नानंतर क्रिकेट स्टेडियममध्ये येण्याचे कारण विचारण्यात आले, यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जोडप्याने सांगितले की, आम्हाला सामना पहायचा होता, म्हणून आम्ही लग्नानंतर लगेचच याठिकाणी आलो आहेत. आम्ही दोघेही पाकिस्तानचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार बाबर आझमचे चाहते आहोत. त्यामुळे बाबर आझमचा ऑटोग्राफ देण्याची आणि त्याच्यासोबत फोटो काढण्याची संधी द्यावी, अशी विनंती आम्ही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे केली आहे. दरम्यान, या जोडप्याला बाबर आझमसोबत फोटो काढण्याची संधी मिळाली की नाही याबद्दल माहिती समोर आलेली नाही. मात्र बाबर आझमने या सामन्यात काही खास कामगिरी केलेली नाही, त्यामुळे जोडप्याची निराशा नक्कीच झाली असेल. कारण बाबर आझम पिल्या डावात फक्त 1 धावा करून बाद झाला, तर दुसऱ्या डावात त्याला 31 धावाच करता आल्या. त्यामुळे गेल्या काही काळापासून बाबर आझम खराब फॉर्मशी झुंजत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.

वेस्ट इंडिजविरुद्ध 35 वर्षांनी पराभवाची पाकिस्तानवर नामुष्की

दरम्यान, मुलतान क्रिकेट स्टेडियमवर पार पडले्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे पाकिस्तानला 35 वर्षांनी वेस्ट इंडिजविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. चौथ्या डावात पाकिस्तानसमोर 254 धावांचे लक्ष्य होते, पण संपूर्ण संघ वेस्ट इंडिजविरुद्ध 133 धावांवर सर्वबाद झाला. यासह वेस्ट इंडिजने 120 धावांनी हा सामना जिंकला. त्यामुळे 2 सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. वेस्ट इंडिजच्या जोमेल वॉरिकनची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.