घरक्रीडापाकिस्तानी चाहत्यांनी शोएबला विचारले, विराटची एवढी स्तुती का? 'हे' मिळाले उत्तर...

पाकिस्तानी चाहत्यांनी शोएबला विचारले, विराटची एवढी स्तुती का? ‘हे’ मिळाले उत्तर…

Subscribe

नवी दिल्ली : भारताचा महान फलंदाज विराट कोहली आजच्या पिढीतील महान फलंदाजांपैकी एक आहे. मागील दोन वर्षांपासून विराट कोहली फॉर्ममध्ये नव्हता, त्यामुळे त्याचा फॉर्म क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय बनला होता. मात्र गेल्या वर्षी आशिया चषक टी-२०मध्ये अफगाणिस्ताविरुद्ध शतक झळकावून त्याने शतकांचा दुष्काळ संपवला आणि पुन्हा एकदा तो फॉर्ममध्ये परतला.

कोहलीसाठी हे सर्व सोपे नव्हेत. त्याने फॉर्मध्ये परतण्यासाठी आणि खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एक महिन्याची सुट्टी घेतली होतो. त्यानंतर ३४ वर्षीय विराटने जोरदार पुनरागमन केले आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकवून देणारी खेळी केली. कोहलीच्या या खेळीने त्यांच्या चाहत्यांमध्ये आणखीनच भर पडली.

- Advertisement -

या चाहत्यांपैकी एक असलेला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने खुलासा केला की तो नेहमी विराट कोहलीबद्दल इतके का बोलतो आणि त्याचे कौतुक का करतो. शोएब अख्तरने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, माझा विश्वास आहे की सचिन तेंडुलकर जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे, पण तो कर्णधार म्हणून अपयशी ठरला आणि त्यामुळेच त्याने स्वत:च कर्णधारपद सोडले.

माझ्या एका मित्रासोबत माझी विराट कोहलीबद्दल चर्चा सुरू असताना मी त्याला म्हणालो की, विराट कुठेतरी हरवला आहे. जेव्हा त्याचे मन शांत होईल तेव्हा तो पुन्हा फॉर्ममध्ये येईल आणि असेच झाले. विराटने टी-२० विश्वचषक गाजवले. कोहलीची जवळपास ४० शतके धावांचा पाठलाग करताना आली आहेत. लोक मला म्हणतात की, तु विराटची खूप स्तुती करतो, मी त्यांना म्हणतो का करू नको? एक काळ असा होता की विराटच्या शतकांमुळे भारत जिंकायचा.

- Advertisement -

कोहली सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघाचा भाग आहे. मात्र, हा स्टार फलंदाज आतापर्यंत खेळल्या गेलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला आहे. चार सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत भारतीय संघ मालिकेत २-१ ने पुढे आहे. परंतु त्यांना जागतिक कसोटी चॅम्पियनच्या अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी चौथा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -