घर क्रीडा Paris Olympics: नीरज चोप्राचे एकाच भाल्यात दोन लक्ष्य; ऑलिंपिकचं तिकीट फायनल

Paris Olympics: नीरज चोप्राचे एकाच भाल्यात दोन लक्ष्य; ऑलिंपिकचं तिकीट फायनल

Subscribe

नीरज चोप्राने पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर भाला फेकत अंतिम फेरी गाठली आहे. याबरोबरच त्याने आपले ऑलिम्पिकचे तिकीट फायनल केले आहे. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये भालाफेक स्पर्धेत नीरजने अंतिम फेरी गाठल्यानं त्याच्या पदरी हे यश आलं आहे.

बुडापेस्ट: नीरज चोप्राने पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर भाला फेकत अंतिम फेरी गाठली आहे. याबरोबरच त्याने आपले ऑलिम्पिकचे तिकीट फायनल केले आहे. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये भालाफेक स्पर्धेत नीरजने अंतिम फेरी गाठल्यानं त्याच्या पदरी हे यश आलं आहे. ही स्पर्धा 27 ऑगस्ट रोजी होणार असून यामध्ये एकूण 12 खेळाडू सहभागी होणार आहेत. (Paris Olympics Neeraj Chopra s two targets in one javelin Olympic ticket final)

हंगेरीची राजधानी बुडापेस्टमध्ये वर्ल्ड अॅथलेटिक्स स्पर्धा सुरू आहे. सध्या क्वॉलिफिकेशन राऊंड म्हणजेच पात्रता फेरी सुरू आहे. नीरज चोप्रा जागितक अॅथेलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला अॅथलिट ठरला आहे. त्यासोबतच नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरला आहे.

नीरज चोप्राला गोल्डन कामगिरी करण्याची संधी

- Advertisement -

अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी खेळाडूला किमान 83 मीटर अंतरावर भाला फेकावा लागतो नीरजने पहिल्याच प्रयत्नात दमदार थ्रो केला आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. भारताला आतापर्यंत या स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे आता नीरज चोप्राला भारतासाठी गोल्डन कामगिरी करण्याची संधी आहे.

2003 मध्ये अंजू बॉबी जॉर्जने कांस्य पदकाची कमाई केली होती. तर, गेल्या वर्षी नीरज चोप्राचं सुवर्ण पदक थोडक्यातच हुकलं होतं, त्यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. पण, यावेळी नीरज चोप्राचं लक्ष्य सुवर्ण पदकावर आहे.

अभिनव बिंद्राची बरोबरी करेल

- Advertisement -

नीरजने जागतिक अॅथेलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्यास तो सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राची बरोबरी करेल, असं केल्यानं, ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियनशिपमध्ये वैयक्तिक सुवर्ण जिंकणारा नीरज हा दुसरा खेळाडू ठरणार आहे. यापूर्वी नेमबाज अभिनव बिंद्राने 2008 च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक तर 2006 मध्ये नेमबाजीत सुवर्णपदक पटकावलं होतं.

( हेही वाचा: Babar Azam : पाक कर्णधार बाबर आझमचा विक्रम; पटकावला पहिला क्रमांक )

- Advertisment -