Homeक्रीडाHardik Pandya : हार्दिक पांड्याच्या फलंदाजीवर पार्थिव पटेलचा सवाल; गंभीर आरोप करत...

Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या फलंदाजीवर पार्थिव पटेलचा सवाल; गंभीर आरोप करत म्हणाला…

Subscribe

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा पराभव झाला. पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना राजकोट येथे खेळवण्यात आला. या सामन्यात इंग्लंडने 26 धावांनी भारताचा पराभव केला. या पराभवानंतर भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.

राजकोट : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा पराभव झाला. पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना राजकोट येथे खेळवण्यात आला. या सामन्यात इंग्लंडने 26 धावांनी भारताचा पराभव केला. या पराभवानंतर भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक आणि फलंदाज पार्थिव पटेल याने भारतीय संघाच्या पराभवाचं खापर अष्टपैलू हार्दिक पांड्यावर टाकलं आहे. ‘हार्दिकने खूप डॉट बॉल खेळले त्यामुळे भारतीय संघाचा पराभव झाला’, असं वक्तव्य त्याने केलं. (parthiv patel on hardik pandya batting questioned after india loss rajkot cricket match)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंगाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडच्या संघाने 171 धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले होते. मात्र या आव्हानाचा पाठलाग करणं भारतीय संघाला कठीण गेलं आणि भारताचा पराभव झाला. पण या पराभवाचं खापर पार्थिव पटेल याने हार्दिक पांड्यावर टाकलं आहे. एका स्पोर्ट वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने हार्दिक पांड्यावर गंभीर आरोप केले आहेत.

नेमकं काय म्हणाला पार्थिव पटेल?

“सेट होण्यासाठी तुम्ही 20-25 चेंडू घेऊ शकत नाही. तुमचा वेळ घेणे मला समजते पण तुम्ही धावा काढत राहाव्या. हार्दिकने कदाचित 35 चेंडूत 40 धावा केल्या असतील, पण त्याने डावाच्या सुरुवातीला बरेच डॉट बॉल खेळले”, असं म्हणत पार्थिव पटेल याने भारतीय संघाच्या पराभवाचं खापर पांड्यावर टाकलं.

दरम्यान, इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हार्दिक पांड्या पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. त्याने 35 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 40 धावा केल्या. तसेच, संपूर्ण संघाला निर्धारित षटकांत 9 गडी गमावून केवळ 145 धावा करता आला.


हेही वाचा – AB de Villiers : Mr 360 बॅक, 4 वर्षांनंतर एबी डिव्हिलिर्स वर्ल्ड चॅम्पियन्सशीप स्पर्धेत करणार कमबॅक