घरक्रीडाPBKS vs KKR : कोलकाता संघाचा ७ धावांनी पराभव; डर्कवर्थ लुईस नियमानुसार...

PBKS vs KKR : कोलकाता संघाचा ७ धावांनी पराभव; डर्कवर्थ लुईस नियमानुसार पंजाबचा पहिला विजय

Subscribe

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मधील १६ व्या हंगामातील दुसरा सामना पंजाब किंग्ज (PBKS) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात मोहालीच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात पंजाबकडून मिळालेल्या 192 धावांचा पाठलाग करताना पावसाच्या व्यत्यायामुळे कोलकाता संघाचा ७ धावांनी पराभव झाला आहे.

कोलकाता संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पंजाब किंग्जकडून डावाची सुरुवात करण्यासाठी कर्णधार शिखर धवन आणि प्रभसिमरन कौर मैदानावर आले, मात्र अवघ्या 23 धावांवर पंजाबची पहिली विकेट पडली. प्रभसिमरन 12 चेंडूंत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 23 धावा करून बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या राजपक्षेसोबत मिळून शिखर धवनने पंजाबचा डाव सांभाळला त्यांनी पहिल्या 6 षटकांत 1 गडी गमावून संघाची धावसंख्या 56 धावांपर्यंत पोहचवली. याशिवाय या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 55 चेंडूंत 86 धावांची भागिदारी केली. यावेळी राजपक्षेने 32 चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने पंजाबसाठी सर्वाधिक 50 धावा केल्या आणि तो बाद झाला.

- Advertisement -

राजपक्षे बाद झाल्यानंतर थोड्या वेळाने पंजाबच्या झटपट दोन विकेट पडल्या. जितेश शर्मा 21 धावा आणि शिखर धवन 40 झावा करून बाद झाला. त्यानंतर थोड्या वेळाने सिकंदर राझा 16 धावा करून बाद झाला. पंजाबच्या 5 विकेट पडल्यानंतर शेवटपर्यंत खेळताना सॅम करण आणि शाहरुख खान यांनी 20 षटकांत पंजाबची धावसंख्या 191 पर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी सॅम करणने 26 तर शाहरुख खानने 11 धावांची नाबाद खेळी केली. यावेळी कोलकाताकडून टीम साऊदीने 2, तर उमेश यादव, सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

पंजाबकडून मिळालेल्या धावांचा पाठलाग करताना कोलकाता संघाची खराब सुरुवात झाली. अवघ्या 29 धावांवर पंजाबच्या ३ विकेट पडल्या होत्या. सलामीवीर मनदीप सिंग (2), अंकुल रॉय (4) आणि रहमानउल्ला गुरबाज (22) धावांवर बाद झाले. यानंतर वेंकटेश अय्यर आणि नितीश राणा यांनी संघाचा डाव सांभाळला. त्यांनी चौथ्या विकेटसाठी 46 धावांची भागादिरी केली. मात्र नितीश राणा 17 चेंडूंत 3 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीने 24 धावांवर बाद झाला. त्यानंतर लगेचच रिंकू सिंग अवघ्या 4 धावांवर बाद झाल्यामुळे कोलकाताच्या 80 धावांवर 5 विकेट एवढी दयनीय अवस्था झाली होती.

- Advertisement -

सातव्या नंबरवर आलेल्या आंद्रे रसेलने वेंकटेश अय्यरसोबत सहाव्या विकेटसाठी 50 धावांची भागिदारी करत संघाचा डाव पुन्हा एकदा सांभाळला. यावेळी रसेलने चांगली खेळी केली. त्याने 19 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 35 धावा करून बाद झाला. त्याच्या पाठोपाठ वेंकटेश अय्यरसुद्धा 28 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीने 34 धावा करून बाद झाला. त्यामुळे 16 षटकात कोलकाता संघाच्या 138 धावांवर 7 विकेट पडल्या होत्या आणि कोलकाताला विजयासाठी 24 चेंडूंत 46 धावांची गरज होती. मात्र याचवेळी पावसाने हजेरी लावली आणि डर्कवर्थ लुईस नियमानुसार कोलकाता संघाचा 7 धावांनी पराभव झाला. यावेळी अर्शदिपने उत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने 3 षटके गोलंदाजी करताना 19 धावा देत सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. याशिवाय सॅम करन, नॅथन एलिस, सिंकदर रझा आणि राहुल चहर यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -