घरक्रीडाPBKS vs KKR : कोलकाता संघाची खराब सुरुवात; 33 धावांवर 3 विकेट

PBKS vs KKR : कोलकाता संघाची खराब सुरुवात; 33 धावांवर 3 विकेट

Subscribe

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मधील १६ व्या हंगामातील दुसरा सामना पंजाब किंग्ज (PBKS) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात मोहालीच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात पंजाबकडून मिळालेल्या 192 धावांचा पाठलाग करताना कोलकाता संघाची खराब सुरूवात झाली आहे. अवघ्या 5 षटकात कोलकाताच्या 33 धावांवर 3 विकेट पडल्या आहेत. अर्शदिपला 2 विकेट, नॅथन एलिसला 1 विकेट मिळाली आहे.

कोलकाता संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पंजाब किंग्जकडून डावाची सुरुवात करण्यासाठी कर्णधार शिखर धवन आणि प्रभसिमरन कौर मैदानावर आले, मात्र अवघ्या 23 धावांवर पंजाबची पहिली विकेट पडली. प्रभसिमरन 12 चेंडूंत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 23 धावा करून बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या राजपक्षेसोबत मिळून शिखर धवनने पंजाबचा डाव सांभाळला त्यांनी पहिल्या 6 षटकांत 1 गडी गमावून संघाची धावसंख्या 56 धावांपर्यंत पोहचवली. याशिवाय या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 55 चेंडूंत 86 धावांची भागिदारी केली. यावेळी राजपक्षेने 32 चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने पंजाबसाठी सर्वाधिक 50 धावा केल्या आणि तो बाद झाला.

- Advertisement -

राजपक्षे बाद झाल्यानंतर थोड्या वेळाने पंजाबच्या झटपट दोन विकेट पडल्या. जितेश शर्मा 21 धावा आणि शिखर धवन 40 झावा करून बाद झाला. त्यानंतर थोड्या वेळाने सिकंदर राझा 16 धावा करून बाद झाला. पंजाबच्या 5 विकेट पडल्यानंतर शेवटपर्यंत खेळताना सॅम करण आणि शाहरुख खान यांनी 20 षटकांत पंजाबची धावसंख्या 191 पर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी सॅम करणने 26 तर शाहरुख खानने 11 धावांची नाबाद खेळी केली. यावेळी कोलकाताकडून टीम साऊदीने 2, तर उमेश यादव, सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

पंजाबकडून मिळालेल्या धावांचा पाठलाग करताना कोलकाता संघाची खराब सुरुवात झाली. सलामीवीर मनदीप सिंग (2), अंकुल रॉय (4) आणि रहमानउल्ला गुरबाज (22) धावांवर बाद झाले. अर्शदिप सिंगने या दोन्ही विकेट घेतल्या. सध्या कोलकाताच्या धावा 4 षटकात 29 धावा करून 3 विकेट पडल्या आहेत. वेंकटेश अय्यर (10) आणि नितीश राणा (7) धावा करून खेळत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -