घरक्रीडाविराट कोहलीकडून सोशल मीडियावर फोटो शेअर, टीकाकारांना एका ओळीत उत्तर

विराट कोहलीकडून सोशल मीडियावर फोटो शेअर, टीकाकारांना एका ओळीत उत्तर

Subscribe

क्रिकेटच्या मैदानाव्यतिरिक्त विराट कोहली सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. इंस्टाग्रामवर विराटचे 180 मिलियन फॉलोअर्स आहेत. रविवारी सकाळी विराट कोहलीने एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये विराट आरशासमोर उभा राहून स्वत:कडे पाहत आहे, असे दिसतेय.

नवी दिल्लीः भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली गेल्या काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या 4 महिन्यांपूर्वी सर्व फॉरमॅटमध्ये कर्णधार असलेला विराट कोहली आता कोणत्याही फॉरमॅटमध्ये भारताचा कर्णधार नाही. दरम्यान, त्याच्या आणि बीसीसीआयमध्ये वाद झाल्याच्या बातम्या खूप समोर आल्या होत्या. विराट आणि रोहित शर्मा यांच्यात मतभेद असल्याचीही चर्चाही रंगली होती. आज म्हणजेच रविवारी विराट कोहलीने एक फोटो शेअर करताना आपल्याला टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलंय.

एका फोटोतून अनेकांना प्रत्युत्तर

क्रिकेटच्या मैदानाव्यतिरिक्त विराट कोहली सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. इंस्टाग्रामवर विराटचे 180 मिलियन फॉलोअर्स आहेत. रविवारी सकाळी विराट कोहलीने एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये विराट आरशासमोर उभा राहून स्वत:कडे पाहत आहे, असे दिसतेय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये विराटने लिहिले की, “तुम्ही नेहमी स्वतःशी स्पर्धा करता”. या फोटोमध्ये विराटच्या कृतीतून आणि या कॅप्शनवरून स्पष्ट होते की, क्रिकेटचा बादशाह कोहली बाहेरच्या जगात सुरू असलेल्या वादाला जुमानत नाही. विराटच्या चाहत्यांकडून या फोटोवर भरपूर लाईक्स आणि कमेंट्स केल्या जात आहेत. या फोटोतील विराटचा लूकही खूप पसंत केला जातोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

- Advertisement -


विराट कोहली रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार

विराट कोहलीने 2017 मध्ये वनडे फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करण्यास सुरुवात केली. आता विराट प्रथमच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्या घरच्या मालिकेत खेळणार आहे. या मालिकेत फलंदाज म्हणून विराट कोहलीकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे. या मालिकेत विराट आपल्या कारकिर्दीतील 71 वे शतकही ठोकू शकतो.


हेही वाचा : Australian Open 2022 : Ashleigh Barty ने रचला इतिहास, ४४ वर्षानंतर ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -