घरक्रीडाPHOTOS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 संघ जाहीर; सूर्यकुमार यादव कर्णधार, इतर खेळाडू कोण आहेत?

PHOTOS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 संघ जाहीर; सूर्यकुमार यादव कर्णधार, इतर खेळाडू कोण आहेत?

Subscribe

मुंबई: आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेत खेळणार आहे. यासाठी बीसीसीआयने संघ जाहीर केला आहे. भारतीय संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे देण्यात आले आहे. रिंकू सिंगचे संघात पुनरागमन झाले असून अक्षर पटेललाही स्थान देण्यात आले आहे. 5 सामन्यांची ही मालिका 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. (PHOTOS T- 20 squad announced against Australia Suryakumar Yadav captain who are the other players)

- Advertisement -

भारतीय संघ गुरुवार 23 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत खेळणार आहे. मालिकेतील शेवटचा सामना 3 डिसेंबरला होणार आहे.

- Advertisement -

पहिला सामना विशाखापट्टणम येथे तर दुसरा सामना 26 नोव्हेंबरला त्रिवेंद्रम येथे होणार आहे. तिसरा T20 सामना 28 नोव्हेंबरला गुवाहाटीमध्ये तर चौथा सामना रायपूरमध्ये 1 डिसेंबरला खेळवला जाईल.

मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी-२० सामना 3 डिसेंबरला बंगळुरूमध्ये खेळवला जाणार आहे.

सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवल्याने क्रिकेट चाहते नाराज असल्याचं दिसत आहे.

अक्षर पटेललाही या संघात स्थान मिळाले आहे. दुखापतीमुळे त्याची वनडे विश्वचषक संघात निवड झाली नाही. सूर्यकुमारच्या जागी अक्षर पटेलला या संघाचा कर्णधार बनवायचं होतं. मात्र अक्षर असताना गायकवाडला ही जबाबदारी का दिली गेली याचा राग चाहत्यांना आहे.

संजू स‌ॅमसनचीही या संघात निवड न झाल्यामुळे चाहते संतापलेले दिसत होते. संजू सॅमसनची वेस्ट इंडिज दौऱ्यावर संघात निवड झाली होती. यानंतर तो आयर्लंड दौऱ्यावरही गेला होता पण यावेळी त्याची संघात निवड झाली नाही. यामुळे संजूचे चाहते प्रचंड संतापलेले दिसत आहेत.

रिंकू सिंगचे संघात पुनरागमन झाले आहे.

भारताचा T20 संघ 

सूर्यकुमार यादव (कर्णधार), रुतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.

(हेही वाचा: सूर्यकुमार कर्णधार कसा? क्रिकेट चाहते संतापले; म्हणाले, 2 खेळाडूंवर अन्याय )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -