घरICC WC 2023IND vs AUS Final : अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या वसीम अक्रमचे भारतीय खेळपट्टीवर...

IND vs AUS Final : अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या वसीम अक्रमचे भारतीय खेळपट्टीवर विधान; म्हणाला…

Subscribe

वनडे वर्ल्डकप 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंजीचा निर्णय घेतला असून भारतीय संघ फलंदाजी करत आहे. मात्र या अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रम याने सुचक विधान केले आहे.

वनडे वर्ल्डकप 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंजीचा निर्णय घेतला असून भारतीय संघ फलंदाजी करत आहे. मात्र या अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रम याने सुचक विधान केले आहे. ‘भारतातील प्रत्येक ठिकाणचे हवामान आणि खेळपट्टी वेगवेगळी असते. त्यामुळे त्या त्या ठिकाणच्या खेळपट्टीवर खेळण्याची भारतीय संघाला सवय झाली आहे’, असे विधान वसीम अक्रम याने केले आहे. वसीम अक्रमच्या या विधानाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. (pitch in different places in india sometimes favors batting and sometimes bowling wasim akrams big statement)

नेमकं काय म्हणाला वसीम अक्रम?

“भारतातील प्रत्येक ठिकाणचे हवामान आणि खेळपट्टी वेगवेगळी असते. त्यामुळे त्या-त्या ठिकाणच्या खेळपट्टीवर खेळण्याची भारतीय संघाला सवय झाली आहे. भारत हा आशियातील सर्वात मजबूत फलंदाजी असलेला संघ आहे. त्याचं कारण म्हणजे, त्यांनी संपूर्ण भारतातील खेळपट्ट्यांवर फलंदाजी केली आहे. भारतातील प्रत्येक मैदान हे वेगळे आहे. कुठे मोठी सीमारेषा आहे तर कुठे लहान आहे. त्यामुळे त्यानुसार त्यांनी स्वतःहा ला त्यानुसार तयार केले आहे. त्यामुळेचं आज टीम इंडियाची फलंदाजी इतकी परिपूर्ण झाली आहे. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी खेळपट्टी ही वेगळ्या स्वरुपाची आहे. त्यामुळे अहमदाबादची खेळपट्टीही मुंबईपेक्षा वेगळी असेल”, असे वसीम अक्रम म्हणाला.

- Advertisement -

हेही वाचा – IND vs AUS WC Final : भारतीय संघ एकमेव बदलासह ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरणार? ‘अशी’ असेल प्लेइंग इलेव्हन

“भारतातील मैदानातील खेळपट्टी ही त्या-त्या विभागातील मातीपासून तयार करण्यात आली आहे. कुठे लाल माती, कुठे काळी माती तर कुठे आणखी दोन्हींचे मिश्रण असलेल्या मातीपासून तयार करण्यात आलेली खेळपट्टी आहे. यामुळे त्या त्या ठिकाणचे गुणधर्म हे त्याठिकाणी ती खेळपट्टी दाखवते. चेन्नईमध्ये फिरकीला मदत करणारी खेळपट्टी आहे. मुंबईमध्ये लाल मातीची खेळपट्टी असून वेगवान गोलंदाज आणि फलंदाजांना या खेळपट्टीची अधिक मदत होते. कोलकाताची खेळपट्टी ही काळ्या मातीची असून फिरकी आणि वेगवान गोलंदाजांना अधिक मदत करते. प्रत्येक ठिकाणचे हवामान देखील वेगळे आहे. कुठे दमट, थंड तर कुठे आणखी वेगळं. त्यामुळे टीम इंडियाला याची सवय झाली आहे. त्यामुळेच मला वाटते की, अंतिम सामना जिंकण्याची संधी ही भारताला अधिक आहे”, असे मिस्बाह-उल-हक म्हणाला.

- Advertisement -

हेही वाचा – विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी पंतप्रधान मोदींनी भारतीय संघाला दिल्या शुभेच्छा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -