घरक्रीडामहाराष्ट्राच्या संकेत सरगरला सुवर्ण

महाराष्ट्राच्या संकेत सरगरला सुवर्ण

Subscribe

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा

महाराष्ट्राच्या संकेत सरगरने गुवाहाटी येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. ज्युनियर मुलांच्या ५५ किलो वजनी गटात संकेतने स्नॅचमध्ये १०७ किलो वजन उचलताना आपला सहकारी प्रशांत कोळीने नोंदवलेला १०४ किलोचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला.

खेलो इंडिया स्पर्धेत सहभागी होण्याची संकेतची ही पहिलीच वेळ आहे आणि त्याने पदार्पणातच एकूण २३९ किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकावले. २३५ किलो वजन उचलणार्‍या ओडिशाच्या मुन्ना नायकला रौप्यपदक, तर २३१ किलो वजन उचलणार्‍या महाराष्ट्राच्या प्रशांत कोळीला कांस्यपदक मिळाले.

- Advertisement -

स्वप्न साकार झाले – संकेत

खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे माझे स्वप्न होते. ते साकार झाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे असे स्पर्धेनंतर संकेतने सांगितले. सांगली येथील ज्येष्ठ खेळाडू बशीर शेख, नानासाहेब आणि मयूर सिंहासने यांच्या प्रोत्साहन व मार्गदर्शनामुळे मी हे यश मिळवू शकलो, असेही संकेत म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -