पंतप्रधान मोदी-राहूल गांधी खचलेल्या भारतीय संघाच्या पाठीशी

पराभव झालेल्या आणि खचलेल्या भारतीय संघासाठी पंतप्रधान मोदी आणि राहूल गांधींचा असा संदेश

आयसीसी विश्वचषक २०१९ च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारतावर १८ धावांनी मात करत थेट अंतिम सामन्यात धडकले. भारतीय संघाच्या अनपेक्षित पराभवाने भारतीय संघासोबतच देशातील प्रत्येक क्रिकेटप्रेमी आणि चाहत्यास दु:ख झाले आहे. भारतीय संघाच्या पराभवावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रतिक्रिया दिली आहे. हा परिणाम निराशाजनक आहे, मात्र, अखेरपर्यंत भारतीय संघाने जी झुंज दिली, ते पाहून बरं वाटले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

“हा परिणाम निराशाजनक आहे. मात्र, अखेरपर्यंत टीम इंडियाने जी झुंज दिली, ते पाहून बरं वाटलं. संपूर्ण टूर्नामेंटमध्ये तुम्ही चांगली फलंदाजी केली, गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं, याबाबत आम्हाला तुमच्यावर अभिमान आहे. विजय आणि पराजय हा जीवनाचा भाग आहे. टीमला त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

असे ट्विट मोदींनी केले तर काँग्रेसचे नेते राहुल गांधींदेखील भारतीय संघासाठी ट्वीट केले.

“आजच्या रात्री करोडो भारतीयांची मनं दुखावल्या गेली असतील. मात्र, टीम इंडिया, तुम्ही चांगला प्रयत्न केला. तुम्हाला प्रेम आणि आदर मिळायला हवा” – काँग्रेस नेते राहुल गांधी

असे ट्वीट राहुल गांधींनी केलं. त्यासोबतच राहुल गांधींनी न्यूझीलंडला त्यांच्या विजयाबाबत शुभेच्छाही दिल्या.