घरICC WC 2023PM Modi on Mohammad Shami: PM Modi झाले मोहम्मद शामीचे फॅन, कौतुक...

PM Modi on Mohammad Shami: PM Modi झाले मोहम्मद शामीचे फॅन, कौतुक करत म्हणाले…

Subscribe

भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या सामन्यात मोहम्मद शामीने शानदार गोलंदाजी करत सात विकेट्स घेतल्या. शामीच्या गोलंदाजीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप कौतुक केले आहे.

ICC Wc 2023: भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या सामन्यात मोहम्मद शामीने शानदार गोलंदाजी करत सात विकेट्स घेतल्या. शामीच्या गोलंदाजीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप कौतुक केले आहे. (PM Narendra Modi on Mohammad Shami PM Modi became a fan of Mohammad Shami praised him)

उपांत्य फेरी अधिक खास बनली ती खेळाडूंच्या चमकदार वैयक्तिक कामगिरीमुळे, याचं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत केलं आहे. मोहम्मद शामीची शानदार गोलंदाजी क्रिकेटप्रेमींच्या भावी पिढ्यांच्या स्मरणात राहील. शमी छान खेळला!”

- Advertisement -

यंदाच्या विश्वचषकात शामीने सहा सामन्यांत 23 बळी घेतले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री शिंदेंनी केले अभिनंदन 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत भारतीय संघाचं कौतुक केलं आहे.  एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंड संघाचा फडशा पाडत भारतवासियांचा दीपावलीचा आनंद केला द्विगुणित… एकसंध भावनेतून फडकविला तिरंगा…, असं ट्वीट त्यांनी केलं.

शामीने उपांत्य फेरीत 7 विकेट घेतल्या

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करत 397 धावांची मोठी धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 327 धावांवर गडगडला. भारतीय संघाचा विश्वचषकातील हा सलग 10वा विजय आहे.

मोहम्मद शमीने घेतले 7 बळी

पंतप्रधान मोदींशिवाय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक नेत्यांनी भारताच्या विजयाचे अभिनंदन केले.

विराट कोहलीने सचिनचा विक्रम मोडला

विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध शानदार शतके झळकावली. या सामन्यात कोहलीने आपले 50 वे शतक पूर्ण केले. हे शतक झळकावून कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विक्रम मोडला. आता एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे.

(हेही वाचा: IND vs NZ : मोहम्मद शामीने वर्चस्व गाजवले, 7 विकेट घेत न्यूझीलंडची मोडली कंबर; लावली विक्रमांची माळ )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -