घरक्रीडापोलार्डचा वानखेडेवरील अनुभव ठरेल फायदेशीर!

पोलार्डचा वानखेडेवरील अनुभव ठरेल फायदेशीर!

Subscribe

अनुभवी किरॉन पोलार्डच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजच्या संघाने सध्या सुरु असलेल्या भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. पहिला सामना गमावणार्‍या विंडीजने दमदार पुनरागमन करत दुसर्‍या टी-२० सामन्यात बाजी मारली. आता या मालिकेतील तिसरा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार असून या मैदानात खेळण्याचा पोलार्डला बराच अनुभव आहे. तो आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. मुंबई इंडियन्सचे घरचे मैदान वानखेडेच आहे. पोलार्डचा हा अनुभव विंडीजसाठी फायदेशीर ठरेल, असे प्रशिक्षक फिल सिमन्स यांना वाटते.

पोलार्डने वानखेडेवर खूप सामने खेळले आहेत. आमचे इतर खेळाडू फारसे अनुभवी नाहीत. पोलार्ड आता या मैदानावर १० वर्षांपासून खेळत आहे. त्यामुळे त्याला इथे कसे खेळायचे हे ठाऊक आहे. त्याच्या या अनुभवाचा खासकरून आमच्या गोलंदाजांना खूप फायदा होईल. आमच्या संघात बरेच युवा खेळाडू आहेत. त्यांच्यासाठीही पोलार्ड संघात असणे फायदेशीर ठरेल. आमच्या खेळाडूंना या दौर्‍यात खूप शिकायला मिळत आहे, असे सिमन्स यांनी सांगितले.

- Advertisement -

पोलार्डची काही दिवसांपूर्वीच विंडीजच्या कर्णधारपदी निवड झाली. पोलार्डच्या नेतृत्वशैलीबद्दल सिमन्स म्हणाले, मी याआधी प्रशिक्षक असताना जेसन होल्डर एकदिवसीय संघाचा कर्णधार होता. मात्र, तो बर्‍याच सामन्यांत उपलब्ध नव्हता. परंतु, पोलार्डचे तसे नाही. तसेच तो सर्व खेळाडूंशी चर्चा करतो. तो प्रत्येक खेळाडूला त्यांची भूमिका काय आहे हे स्पष्टपणे सांगतो. तो संघासाठी काहीही करण्यास तयार असतो आणि संघातील इतर खेळाडूंना हे माहित आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -