Rohit Sharma: रोहित शर्मा मोठा कर्णधार होण्यामागे ॲडम गिलक्रिस्टचा हात, प्रज्ञान ओझाचा दावा

Pragyan Ojha comment rohit sharma great captain because of Adam Gilchirst
Rohit Sharma: रोहित शर्मा मोठा कर्णधार होण्यामागे ॲडम गिलक्रिस्टचा हात, प्रज्ञान ओझाचा दावा

भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा हा इतका मोठा कर्णधार झाला यामागे ऑस्ट्रेलियन क्रिकेट पटू आणि संघाचा माजी यष्टिरक्षक ॲडम गिलक्रिस्टचा हात असल्याचे भारताचा खेळाडू प्रज्ञान ओझाने सांगितले. रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये टीम इंडिया चांगले प्रदर्शन करत आहे. टी२० क्रिकेट म्हणजेच आयपीएलमधील सर्वता चांगला आणि यशस्वी कर्णधार रोहित शर्मा आहे. ग्रिलख्रिस्टमुळे रोहित शर्मा चांगला कर्णधार बनला आहे. त्यामुळे त्याच्या यशाचे श्रेय ॲडम गिलक्रिस्टला जाते असे वक्तव्य प्रज्ञान ओझाने केलं आहे.

प्रज्ञान ओझा म्हणाला की, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला सर्वाधिक यश मिळालं यामध्ये काही शंका नाही. तसेच तो या संघाचा देखील यशस्वी कर्णधार आहे. ॲडम गिलक्रिस्टने त्याच्यातील कर्णधारपदाची गुणवत्ता, कौशल्य पाहिले आणि रोहित शर्माला डेक्कन चार्जर्स संघाचा उपकर्णधार केले. त्याच्याशिवाय संघात अनेक वरिष्ठ खेळाडू होते परंतु ॲडम गिलक्रिस्टने रोहित शर्माला उपकर्णधार पदाची जबाबदारी दिली.

आयपीएलमध्ये आपल्या करिअरची सुरुवात रोहित शर्माने डेक्कन चार्जर्स संघातून केली. त्यावेळी हैदराबाद संघाचा ॲडम गिलक्रिस्ट कर्णधार होता. तेव्हा रोहित शर्माने आयपीएलमध्ये पहिला सामना खेळला होता. या संघानंतर रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या संघात गेला. २०१३ मध्ये रिकी पॉटिंगच्या जागी रोहित शर्माला कर्णधार करण्यात आले. यानंतर आतापर्यंत हा संघ सर्वात जास्त सामने आपल्या नावे करत आला असून पहिल्या क्रमांकाचा झाला आहे.


हेही वाचा : Peng Shuai: टेनिसपटू पेंग शुआई बेपत्ता, थेट संवाद नाही