घरक्रीडाअनुष्काचा हॉट फोटो ठरला विराटचा लकी चार्म; पहिल्याच सामन्यात विजयी सलामी

अनुष्काचा हॉट फोटो ठरला विराटचा लकी चार्म; पहिल्याच सामन्यात विजयी सलामी

Subscribe

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही जोडी नेहमीच चर्चेत असते. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान आज विराट कोहलीचा आयपीएलमधील पहिला सामना आहे. विराट कोहली आरसीबीच्या संघाचा कर्णधार असून सनरायझर्स हैदराबादसोबत सामना विराटच्या संघाचा पहिला सामना होता. या सामन्यापूर्वी विराटची पत्नी अनुष्का शर्माने एक हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. अनुष्काचा हाच हॉट फोटो विराटसाठी लकी चार्म ठरला आहे. आयपीएलच्या तेराव्या मोसमाच्या आपल्या पहिल्या सामन्यात हैदराबादला विराट कोहलीच्या आरसीबी संघाने  १० धावांनी पराभूत केले आहे. सध्या अनुष्काचा हाच हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

२७ ऑगस्टला विराट कोहलीने दोनाचे तीन होणार असल्याची गोड बातमी दिली होती. त्यावेळेस विराटने अनुष्काच्या बेबी बम्पचा फोटो शेअर केला होता. या गोड बातमीनंतर युएईमध्ये विराट आणि अनुष्काने आरसीबीच्या संघाला जंगी पार्टी दिली. यानंतर पहिल्यांदाच अनुष्काचा बेबी बम्पसोबत फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

View this post on Instagram

And then, we were three! Arriving Jan 2021 ❤️🙏

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

- Advertisement -

हा फोटो शेअर करताना अनुष्काने लिहिले आहे की, ‘ज्यांनी मला जगातील चांगल्या गोष्टींवर विश्वास दाखवण्यासाठी प्रेरणा दिली, त्या सर्वांचे आभार. ही संदेश जास्त लोकापर्यंत पोहोचावा असा मी प्रयत्न करत आहे.’

- Advertisement -

विराट कोहलीच्या पहिल्या सामन्यापूर्वी युएईतील हॉटेलमधील स्विमिंग पूलमध्ये अनुष्का दिसत आहे. स्विमिंग सूटमधला अनुष्काच्या हॉट फोटोवर चाहत्यांच्या लाईक्सचा वर्षाव होत आहे. आतापर्यंत अनुष्का या हॉट फोटोला २७ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.


हेही वाचा – IPL 2020 : आरसीबीची विजयी सलामी; हैदराबादवर १० धावांनी मात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -