IPL Auction : आयपीएल लिलावात प्रिती झिंटाने १५ मिनिटात खर्च केले १७.५० कोटी

दिल्लीने रबाडाला याआधी ४ कोटींना खरेदी केले होते. नुकत्याच झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये भारत जिंकण्यात रबाडाचा मोलाचा वाटा होता.

Preity Zinta spends Rs 17.50 crore in 15 minutes in IPL auction
IPL Auction : आयपीएल लिलावात प्रिती झिंटाने १५ मिनिटात खर्च केले १७.५० कोटी

IPL Auction : आयपीएल २०२२च्या १५ व्या हंगामासाठी मेगा लिलाव प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली असून प्रिती झिंटाच्या पंजाब किंग्जमध्ये दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर कगिसो रबाडाला तब्बल ९ कोटी २५ लाखांना विकत घेतले आहे. यंदाच्या हंगामात रबाडाने चांगलाच धमाका केल्याचे पाहायला मिळाले. या सगळ्यात प्रिती झिंटाच्या पंजाब किंग्जने अवघ्या १५ मिनिटात १७.५० कोटी रुपये खर्च केले. यंदाच्या प्रिती झिंटा आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी झालेली नाही. तिच्या वतीने तिचे प्रतिनिधी या लिलाव प्रक्रियेत सहभागी झाले आहेत.

आयपीएलच्या मागील हंगामात रबाडा हा दिल्ली कॅपिटलसोबत होता. पण यावेळी दिल्लीने रबाडाला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आणि रबाडावर दणकून बोली लागली अखरे ९ कोटी २५ लाखांना प्रिती झिंटाच्या पंजाब किंग्जने त्याला विकत घेतले. दिल्लीने रबाडाला याआधी ४ कोटींना खरेदी केले होते. नुकत्याच झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये भारत जिंकण्यात रबाडाचा मोलाचा वाटा होता.

दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर म्हणून प्रसिद्ध असलेला कगिसो रबाजा हा २०१७ पासून आयपीएलमध्ये खेळतोय. आतापर्यंत झालेल्या ५० सामनान्यांमध्ये रबाडाने ८.२१ इकोनॉमी रेट आणि २०.५३ च्या सरासरी ७६ विकेट घेतल्याचा त्याचा रेकॉर्ड आहे. बॉलिंग आणि खालच्या क्रमाकांवर छोटे शॉर्ट मारणे ही रबाडाची खासियत आहे.

प्रिती झिंटा काही दिवसांपूर्वीच सरोगसीच्या माध्यमातून आई झाली. तिच्या तान्ह्या बाळाला सोडून ती भारतात येऊ शकत नसल्याने ती आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार नाहीये. मात्र प्रिती आणि तिची संपूर्ण टीम लिलाव प्रक्रियेत एकमेकांच्या संपर्कात असून  क्रिकेटसंदर्भातील गोष्टींवर चर्चा करत आहेत.


हेही वाचा –  यंदाच्या IPL लिलाव प्रक्रियेला प्रिती झिंटा मुकणार, ‘हे’ आहे कारण